कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जळगावच्या भूमीत, १९४४ साली खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली ‘ज्ञान प्रसारो व्रतम’ या ब्रीद वाक्यासह शिक्षण प्रसारासाठी कटिबद्ध आहे. गेल्या ८० वर्षांपासून ही संस्था उत्तर महाराष्ट्रात शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाचे केंद्र बनली आहे. ‘नॉलेज इज पॉवर’ या विचारावर आधारित ही संस्था एक प्रगत शैक्षणिक चळवळ म्हणून ओळखली जाते. 26 एकर परिसरात पसरलेल्या या संस्थेत २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत.
KCE Society Vardhapan Din 16 x 25 CM Ad 2025
आधी कळस नंतर पाया याची उक्ती संस्थेच्या पी जी टू के जी ही शैक्षणिक प्रगती बघतांना लक्षात येते. सन १९४५ यावर्षी मूळजी जेठा महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. गौरवाची बाब म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यादेखील याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत.१९६५ यावर्षी शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची स्थापना झाली त्यानंतर १९७० यावर्षी एस. एस. माणियार विधी महाविद्यालयाची स्थापना,१९८६ यावर्षी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कॉलेजची स्थापना करण्यात आली याला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता मिळाली आहे आणि ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे. १९८६ यावर्षी किलबिल बालक मंदिर आणि गुरुवर्य परशुराम विठ्ठल पाटील प्राथमिक शाळेची स्थापना झाली तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. १९९७ यावर्षी ओरिऑन इंग्लिश मीडियम स्कूल (स्टेट बोर्ड) ची स्थापना झाली.२००४ यावर्षी एकलव्य क्रीडा संकुलाची स्थापना झाली ज्यात व्यायामशाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव,स्क्वॅश,हॉलीबॉल,क्रिकेट,खो-खो,कबड्डी,बॅटमिंटन,फुटबॉल इतर खेळ सुविधांसह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.२००५ यावर्षी अध्यापक विद्यालय,२००७ यावर्षी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ओजस्विनी कला महाविद्यालय,२००९ यावर्षी स्पार्क इन्स्टिट्यूट ऑफ मल्टिमीडिया अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी २०१० यावर्षी ओरिऑन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड रिसर्च तसेच ज्ञानज्योत इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पेटेटिव्ह एक्सलन्सची स्थापना करण्यात आली. २०१४ यावर्षी कान्ह ललित कला केंद्र येथे संगीत, चित्रकला, नृत्य, नाट्य यांसारख्या कलांचे शिक्षण दिले जाते. सांस्कृतिक प्रगतीसाठी कान्ह ललित कला केंद्र विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहे आणि त्यांच्या “प्रतिशोध” नाटकाने राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्लीद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवात संस्थेचे प्रतिनिधित्व केले आहे.आणि २०१८ यावर्षी डॉ. अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना करण्यात आली.
केसीई सोसायटीने विविध सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विस्तृत शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले आहेत. यात कला, विज्ञान, शिक्षणशास्त्र, व्यवसाय प्रशासन, अभियांत्रिकी, संगणक विज्ञान अशा अनेक विषयांचा यात समावेश आहे.संस्थेने नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण (NEP) स्वीकारले असून, 5+3+3+4 संरचनेची अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थी-केंद्रित, रोजगाराभिमुख आणि कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांवर विशेष लक्ष दिले जात आहे.संपूर्ण कामकाज संगणकीकृत केले असून, दूरस्थ शिक्षणासाठी व्हिडिओ आणि ऑडिओ लेक्चर्सची व्यवस्था केली जात आहे. सध्या ४५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले मुलांचे वसतिगृह आणि ६०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्रेक्षागृह बांधले जात आहे. एस.एस. मणियार विधी आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची नवीन इमारत लवकरच पूर्ण होईल. विधी महाविद्यालय वगळता संस्थेच्या इतर सर्व महाविद्यालयांनाही स्वायत्तता मिळाली आहे. मूळजी जेठा महाविद्यालयाला ‘अधिकृत प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ हा विशेष दर्जा मिळाल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भविष्यात सर्व महाविद्यालयांना एकत्र करून ‘अभिमत विद्यापीठ’ (Deemed University) स्थापन करण्याचे संस्थेचे ध्येय आहे.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि संचालक मंडळ हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. भविष्यात संशोधन आणि माहिती तंत्रज्ञानावर भर देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यासाठी उत्साहपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी वातावरण तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे.
या संस्थेच्या शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीत अनेक नामवंतांचे विचारसिंचन लाभले आहे. यात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, प्रतिभाताई पाटील (याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी), प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, आणि पद्मश्री पी.टी. उषा अशा अनेक महान व्यक्तींचा समावेश आहे. हा समृद्ध वारसा संस्थेला सतत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे.