Breking news | जळगाव,(प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी याबाबत आदेश जारी केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी
२९ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी या घटनेबाबत आवाज उठवत संदीप पाटील यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली होती.
फिर्याद देण्यासाठी आलेली महिला तात्पुरती परत गेल्याने गुन्हा अधिकृतरीत्या नोंदवला जाऊ शकला नव्हता. मात्र या संपूर्ण घटनेबाबतचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नैतिकतेला बाधा आणणारे कृत्य झाल्याचे नमूद करून विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केला होता.
निलंबनाची कारवाई
या अहवालाच्या आधारे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तत्काळ कारवाई करत पीआय संदीप पाटील यांचे निलंबन आदेश शुक्रवारी काढले. दरम्यान, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत केली जाणार असल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले.
पुढील कारवाईवर लक्ष
या प्रकरणामुळे जिल्ह्यात तसेच पोलिस विभागात मोठी चर्चा रंगली आहे. पोलिसांवर असलेला जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी अशा आरोपांवर कठोर कारवाई केली जाणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
Latest news :
Personal Finance : चिंता सोडा! CIBIL स्कोअर नसतांना मिळेल कर्ज, केंद्र सरकार कडून मोठा खुलासा
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…
US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!










