Sex Racket News नाशिक | २२ ऑगस्ट – नाशिक शहरातील मुंबईनाका परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) मोठी कारवाई करत पाच पीडित मुलींची सुटका केली. या मुलींना इतर राज्यांतून आणून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी संशयित महिला खुशबु परेश सुराणा हिला अटक करण्यात आली असून, तिच्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
शहरात मसाज पार्लरच्या आडून सुरू असलेल्या देहव्यापाराच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.२१) कारवाई केली.
सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबईनाका हद्दीतील ‘आरंभ स्पा’ या पार्लरवर छापा टाकला. यावेळी मसाजच्या नावाखाली चालणारा वेश्याव्यवसाय उघड झाला.
संशयित महिलेची अटक, पीडितांची सुटका
कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली. या सर्व मुली उत्तर भारतातील विविध राज्यांमधून – कानपूर, दिल्ली, बिहार व मिझोराम येथून आणण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधील एका महिलेचाही यात समावेश आहे.
सदर महिलांना आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने देहव्यापारास प्रवृत्त करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. यावेळी मुख्य आरोपी खुशबु परेश सुराणा हिला ताब्यात घेऊन तिच्यावर पिटा व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही गुन्हे नोंदलेले
आरोपी महिलेविरुद्ध याआधी देखील अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिस अधिक कठोर पावले उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा