रावेर ,अमळनेर आणि चोपडा या तीन बाजार समित्या वगळता आडत व्यापाऱ्यांची दुकाने सुरु
जळगाव ;- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत पाडल्याने बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांनी आज बंद पाळला होता. मात्र व्यापाऱ्यांनी त्याला संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. आजच्या बंदमध्ये सर्वच बाजार समित्यांनी सहभाग घेतल्याने संप यशस्वी झाल्याचा दावा जळगाव मार्केट यार्ड असोसिएशन दावा करण्यात आला आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी जळगाव कृषी बाजार समितीची संरक्षक भिंत विकासकाने परवानगी न घेता पाडून टाकली होती.यामुळे बाजार समितीच्या परिसरातील व्यापाऱ्यांच्या मालाला संरक्षण नसल्याने धोका निर्माण झाल्याचा दावा करीत जळगाव मार्केट यार्ड असोसिएशनने व्यापार बंद आंदोलन सुरू केले आहे. पाठिंबा म्हणून गेल्या शुक्रवारी जळगाव दाणा बाजार व्यापारी असोसिएशनने बंद पुकारून मार्केट यार्डच्या व्यापाऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला होता. आज जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांनी पाठिंबा म्हणून बंद पुकारला. तसे पत्रही बाजार समितीच्या सचिवांकडे दिले. मात्र प्रत्यक्षात अनेक व्यापाऱ्यांनी सकाळी व्यवहार बंद ठेवून दुपारी व्यवहार सुरू ठेवले. काहींनी अर्धवट दुकाने सुरू ठेवली.
मात्र जिल्ह्यातील पाठिंब्याच्या नावाखाली बंद हा पाळण्यात आला नसल्याचे चित्र दिसून आले. केवळ रावेर ,अमळनेर आणि चोपडा या तीन बाजार समित्या वगळता जिल्ह्यातील इतर आडत व्यापाऱ्यांची दुकाने सुरु असल्याचे दिसून आल्याने बंदचा दावा फोल ठरला आहे . तर जळगावातही बाजार समितीमध्ये काही दुकानांमध्ये धान्याची आवक – जावक होत असल्याचे चित्र दिसून आले. अनेकांनी आपले व्यवहार बंदच्या नावाखाली सुरु ठेवले आहे. सध्या पेरणीचा मौसम आहे . त्यामुळे शेतकऱ्यांकडे बाजार समितीत विक्रीसाठी माल येणे बंद आहे . त्यामुळे सध्या परिस्थितीचा अंदाज घेतला असता केवळ व्यापाऱ्यांच्या मालाची विक्री होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पारोळा, रावेर, यावल येथील बाजार समितीत बंद होता असे पत्र जळगाव मार्केट यार्ड व्यापारी असोसएिशनचे सचिव अशोककुमार राठी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
——————