भडगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील गुढे येथील सुपुत्र भारतीय सैन्य सीमा सुरक्षा दलातील(बीएसएफ)५७ बटालियन जी.डी.काॅन्सटेबल जवान स्वप्नील सुभाष सोनवणे
(पाटील)वय ३९ हे ११वर्षापासून देशात विविध ठिकाणी सेवा बजावून आता ते भारत बांगलादेश सिमेवरील पश्र्चिम बंगाल येथे देशसेवा बजावत असताना त्यांना दि.९ रोजी रक्षा बंधनाच्या दिवशीच रात्री ८:३०वीजेचा धक्का बसून वीरमरण आले ही बातमी आल्यावर कुटुंब व गाव शोकमग्न झाले तीन दिवस गावात सार्वजनिक दुखवटा पाळण्यात आला.दि.१२ रोजी त्यांचे पार्थिव विशेष विमानाने कलकत्ता,मुंबई,इंदोरवरून विशेष सैनिक वाहनाने येथून कळमळू,जामदा,भवाळी,बहाळ मार्गे येत या ठिकाणी देखील स्वयंस्फूर्तीने मिरवणूक व पुष्पवृष्टी करण्यात आली सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव मुळगावी घरी आले.यावेळी पत्नी कविता मुलगा रूद्राक्ष,मुलगी योगेश्वरी आई कल्पना,बहिणी परिवारातील सदस्य व नातेवाईक मित्र परिवार,
ग्रामस्थांनी मुखदर्शन घेतले तेव्हा मोठा हंबरडा फुटला कुंटुबासह उपस्थित अनेकांना अश्रू अनावर झाले या ठिकाणी आरती करण्यात आली.या नंतर तिरंगा ध्वज व फुगे,पताका व फुलांनी सजविलेल्या वाहनावरून त्यांची अंत्ययात्रा घरापासून गावातील मुख्य गल्लीतून काढण्यात आली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यानी अंगणे,चौक सजली होती गावात चौका चौकात श्रध्दांजली बॅनर लावण्यात आले होते.यावेळी भारत माता की जय,शहीद जवान स्वप्नील सोनवणे अमर रहे,अशा विविध घोषणांनी गाव दणाणून गेले होते.
अंत्ययात्रा मिरवणूकीत गावातील परिसरातील मोठ्या संख्येने महिला,पुरुष तरूण वर्ग शाळकरी मुले सहभागी झाले होते एक कि.मी पर्यंत अंत्ययात्रेची मिरवणूक निघाली होती अग्रभागी पाच बॅन्ड पथकवर देशभक्ती पर गीत गायली जात होती पार्थिववर व पुढे रॅलीत पुष्पवृष्टी करण्यात येत होती अग्रभागी नानासाहेब कृ.दे.पाटील स.मा विद्यालय विद्यार्थ्यांनी व आयुष करिअर ॲकेडमी जळगांव २०० मीटर तिरंगा रॅली बरोबर परिसरातील शेकडो तरुण सहभागी झाले होते यानंतर गावापासून २कि.मी.अंतरावरील गुढे
फाट्यावर गावातील तरुणांनी व माजी सैनिक यांनी नियोजन व परिश्रम घेत मोकळया जागेवर त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्कारसाठी आणण्यात आले सर्वात आदी वीर माता,पत्नी आदी परिवारातील सदस्य तसेच भडगाव,चाळीसगाव पाचोरा आदी जिल्ह्यांतील सुट्टीवर आलेले सैनिक व माजी सैनिक तसेच यांनी रितं पुष्पचक्र वाहिले यानंतर सरपंच,पोलिस पाटील,
तलाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शहीद सागर पाटील व राहुल माळी यांचा परिवार बरोबर शासनाच्यावतीने तहसीलदार शितल सोलाट,पोलिस निरीक्षक सुशीलकुमार सोनवणे नायब तहसीलदार सुधीर सोनवणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड,५७ बटालियनचे इन्स्पेक्टर कमल किशोर व तुकडीतील ९ सैनिक यांनी व विविध राजकीय पक्षांचे व विविध संस्था,संघटनेचे आजी माजी पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले यानंतर महाराष्ट्र पोलीस जळगांव मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल संतोष सुरवाडे यांच्या ११ पोलिस कर्मचारी व ५७ बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर यांच्या ९ जवानांच्या तुकडीने मानवंदना बिगुल वाजवून तीन, पायरी देऊन सलामी दिली यानंतर बीएसएफ व प्रशासनाच्यावतीने शहिद जवान माता,पत्नी दोन्ही लहानग्या रूद्राक्ष व योगेश्वरी यांच्याकडे तिरंगा ध्वज सुपूर्द करण्यात आला यानंतर रूद्राक्ष व योगेश्वरी यांनी वडिलांना अग्नीडाग देत अखेरचा निरोप दिला यावेळी वातावरण अगदी सुन्न होत अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
( हृदय पिळवटून टाकणारा कुटुंबाचा आक्रोश पहाटेपासून गुढे गावात नातेवाईक मित्र परिवार ग्रामस्थांची गर्दी जमू लागली होती दरम्यान पार्थिव गावात दाखल झाले आणि कुटुंबासह गावकरी उपस्थित यांचा अश्रूंचा बांध फुटला स्वप्नीलच्या नव्या घरी पार्थिव आल्यानंतर पत्नी कविता आई कल्पना, बहिणी व चुलत भाऊ माजी सैनिक शशीकांत सोनवणे एसएसबीचे जवान जयवंत सोनवणे लहान मुले रूद्राक्ष व योगेश्वरी यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता)