Maharashtra Mega Bharti 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले की, राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जाणून घ्या कोणत्या विभागांमध्ये भरती होणार आहे.
मुंबई,: राज्य शासन लवकरच विविध विभागांतील रिक्त पदांसाठी ‘मेगा भरती’ घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. राज्यातील सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला असून, या कार्यक्रमांतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
भरतीपूर्व तयारी काय आहे?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम खालील बाबींवर भर दिला जात आहे:
आकृतीबंध व भरती नियमांचे पुनर्रचना
१००% अनुकंपा तत्वावरील भरती
रिक्त पदांची अचूक आकडेवारी तयार करणे
ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून जात वैधता प्रमाणपत्रे सुलभ करणे
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष भरती योजना
भास्कर जाधव, नितीन राऊत, नाना पटोले यांच्यासह अन्य सदस्यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. यावर मुख्यमंत्री म्हणाले:
अनुसूचित जमाती प्रवर्गातील 6,860 पदांवर कार्यरत कर्मचारी आहेत, ज्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्याप मान्य झालेले नाही.
या कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून पदावर ठेवले जाईल, पण त्यांना बढती दिली जाणार नाही.
1343 पदे भरली गेली असून उर्वरित पदांसाठी कार्यवाही सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भरतीला गती
सफाई कामगारांची पदे आता वारसा हक्काने भरता येणार, कारण यावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे.
लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार या भरती प्रक्रिया राबवली जाईल.
—
जिल्हानिहाय आणि विभागनिहाय भरतीचा आढावा
सार्वजनिक बांधकाम विभाग
आरोग्य विभाग
शिक्षण विभाग
पोलीस विभाग
या विभागांमध्ये भरती होण्याची शक्यता जास्त आहे.
भविष्यातील अपडेटसाठी काय करावे?
अधिकृत पोर्टलवर नियमित भेट द्या
OTR (One Time Registration) आधीच करून ठेवा
जात वैधता व इतर प्रमाणपत्रे अपडेट ठेवा