जळगाव दि.13 (प्रतिनिधी) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 13 जळगाव मतदार संघासाठी होणाऱ्या मतदानासाठी,मतदान जनजागृती स्वीप कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात ८ नोव्हेंबर पासून करण्यात आली आहे.
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिकातर्फे मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यात फलक लेखन,शहरातील प्रमुख चौकात पथनाट्य, शाळा व वार्डात रांगोळी स्पर्धा असे अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासोबतच बीएलओ व आशा वर्कर यांच्या सहयोगाने प्रत्येक घरापर्यंत पोहचून मतदानचा टक्का वाढविण्यासाठी विषेश प्रयत्न देखील करण्यात येत आहे. मतदार यादीचा क्युआर कोड सर्व बँकामध्ये व शासकिय कार्यालयामध्ये लावण्यात आला आहे. तसेच आकाशवाणी / एफएम् रेडीओ/ लोकल केबल नेटवर्क या विविध मिडीयांमार्फत जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. सध्याच्या सोशल मिडियाच्या युगात तरुणांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठई रिल्स द्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. रिल्स स्पर्धा, पथनाट्यद्वारे जनजागृती, वासुदेव व पोतराजद्वारे विविध ठिकाणी तसेच रथ उत्सवात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदानाचे कर्तव्य बजवावे. असे आवाहन मनपा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.