जळगाव,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा दिवस पार पडणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती मधील बंडखोरांनी विद्यमान आमदारांना आणि उमेदवारांना घाम फोडला आहे.नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये ३७२ नामनिर्देशन पत्र भरण्यात आली असून २५८ उमेदवारांची संख्या आहे. यात आघाडी व महायुती मधील नेत्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून बंडखोरांनाचे बंड कशी होतील थंड हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.ही डोकेदुखी ४ तारखेच्या माघारीची वाट पाहत आहे.
महायुतीतील बंड, कसे होणार थंड?
जळगाव शहर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे अश्विन सोनवणे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला तर अमळनेर विधानसभा मधून महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवाराविरुद्ध गेल्या वेळेस पराभूत झालेले भाजपचे व आताच्या पक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी बंड पुकारले आहे. तर एरंडोल महायुतीचे शिवसेना गटाचे उमेदवाराविरुद्ध अजित राजेंद्र पाटील व भाजपाचे माजी खासदार ए.टी.नाना पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. तर पाचोरा या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार विरुद्ध भाजपाचे अमोल यांनी बंड केले आहे.
संकट मोचक गिरीश महाजन मोठी जबाबदारी
जळगाव जिल्हातील महायुतीमध्ये नाराज झालेल्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारले असून यामुळे महायुतीचे उमेदवारांचे टेन्शन वाढलं आहे. दरम्यान महायुतीच्या उमेदवारंसमोर बंड करून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली ताकद दाखवून दिल्याने महायुतीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढलं असून बंड थंड करण्यासाठी भाजपाने एक प्लॅन तयार केल्याचं समजतं त्यात बंड केलेल्या उमेदवारांशी वन टू वन चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तर जळगाव जिल्ह्यातील महायुतीतील बंड थंड करण्याची जबाबदारी साहजिकच राज्याचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे.आता मंत्री गिरीष महाजन बंड केलेल्या इच्छुकांना कोणतं अश्वासन, कोणता शब्द ठेवून थंड करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.