जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रातील नामनिर्देशन पत्राची आज छाननी करण्यात आले यामध्ये २६ अर्ज अवैध ठरले तर २०७ अर्ज वैध ठरले. असे असले तरी युतीमधील उमेदवारांनी बंडखोरी केली असल्याने माघारीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रामध्ये अंमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण या मध्ये २३३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते आज (दि.३०) रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. यामध्ये २६ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले तर २०७ नामनिर्देशन पत्र वैध ठरलेले आहेत. यामध्ये मुख्यतः जामनेर मध्ये साधना महाजन, रावेरमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी, जयश्री अमोल जावळे, भुसावळ मध्ये रंजनी सावकारे, जळगाव ग्रामीणमध्ये विशाल देवकर यांच्यासह इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमधील अंमळनेर, पाचोरा, चोपडा, एरंडोल, जळगाव शहर या ठिकाणी झालेली बंडखोरी विद्यमान आमदारांना डोकेदुखी ठरलेली आहे. त्यामुळे युतीचे संकट मोचक काय भूमिका घेतात तसेच चार तारखेला कोण कोण माघार घेणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.