लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे मोठी बाजारपेठ आहे विशेषत: भाजीपाला मार्केट साठी लोहारा गाव सुप्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून याच गावातील शेतकऱ्यांची थट्टा होताना दिसून येत आहे .सविस्तर वृत्त असे की लोहारा येथील ऋषी बाबा (रोटवद ता. जामनेर) जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे .या परिसरात अनेक शेतकऱ्यांचे शेत आहेत तसेच हा रस्ता अत्यंत पौराणिक असणाऱ्या ऋषी बाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडला जातो.
नजर कैद पोर्टल पॅनल ने मागील वर्षीही या रस्त्या संदर्भात अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते. मात्र अनेक संबंधित अधिकारी – पदाधिकारी यांनी केवळ वेळ मारून नेली आहे. आज पर्यंत त्यांनी कोणताच पाठपुरावा केलेला नाही फक्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन वाटण्याचा अक्षता शेतकऱ्यांच्या हातात दिल्या जातात हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून आता तर या रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. किमान आता तरी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन या रस्त्यावर खडी, मुरूम टाकून रस्ता चालण्यायोग्य करून घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी अगदी स्वखर्चाने याच रस्त्यावर दगड, गोटे ,मुरूम टाकले होते तरीही झोपेचे सोंग घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अजून पर्यंत जाग आलेली नाही. शेतकरी संतप्त झाले असून त्वरित या रस्त्याला दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.