जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्र गौरव , हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे 484 व्या जयंती निमित्त आज दिनांक ९ रोजी जळगाव येथील महाराणा प्रताप सिंह यांचे स्मारक जवळ प्रतिमा पूजन व माल्याअर्पण करत अभिवादन करण्यात आले प्रसंगी महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती चे संस्थापक अध्यक्ष डॉ.जी,एन.पाटील ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा प्रमुख उदयसिंह दादा पाटील,स्मारक समिती सदस्य ,विनोद शिंदे,नंदन सिंह पाटील ,जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे ,महानगरपालिका आयुक्त, राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील ,खान्देश विभाग प्रमुख विलाससिंह पाटील ,खान्देश कार्याध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे , जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष बी.एच. खंडालकर ,खान्देश प्रावक्ता प्रा.डॉ.कॅप्टन राजेंद्र सिंह राजपूत ,क्षत्रिय महासभा प्रदेश युवक अध्यक्ष संग्राम सिंह सुर्यवंशी ,सामाजिक कार्यकर्ता रोशन सिंह राजपूत , ॲड,योगेश राजपूत , संचालाल बोराडे , आशिष हाडा आशिष राजपूत ,विकास राजपूत ,अभिजित राजपूत ,ईश्वर जाधव ,वैभव मोरे व राणा राजपूत समाजातील महिला पुरुष युवक व बालगोपाल मंडली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापूजी यांचा सत्कार प्रवीण सिंह पाटील यांनी केला तर आमदार राजू मामा भोळे यांचा सत्कार संग्राम सिंह सुर्यवंशी यांनी केला,उदय सिंह दादा यांचा सत्कार विठ्ठल सिंह मोरे यांनी केला असता प्रसंगी अपराजित योद्धा महाराणा प्रतापसिंह यांचे जीवन चरित्रावर इतिहास उजळणी प्रा, राजेंद्र सिंह राजपूत व आमदार राजू मामा भोळे यांनी केली तर जी,एन,बापूजी यांनी स्मारक उभारताना किती अडचणी आल्या याचा लेखा जोझा मांडला सूत्र संचालन व आभार विलास सिंह पाटील मुक्ताईनगर यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव टीम मेहनत घेतली.