पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे(Manoj jarange )यांनी (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारपासून उपोषणाचा चौथा टप्पा सुरू केला आहे असून मागण्या मंजूर न झाल्यास विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे यामुळे पुन्हा राज्यातील महायुती सरकारचं टेन्शन वाढवलं आहे, दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातील अपेक्षेप्रमाणे यश आलं नसल्याने महायुती आधीचं चिंतेत असतांना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुर्ण न झाल्यास २८८ जागेवर विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हटले मनोज जरांगे पाटील
”राजकारण माझा धर्म नाही, मात्र मागण्या मंजूर न झाल्यास सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार,” असा इशारा मनोज जरांगे यांनी या वेळी दिला.पोलिसांनी जरांगे यांना परवानगी नाकारली होती,तरीही उपोषण सुरू केले आहे. या वेळी मनोज जरांगे म्हणाले, ”मी आरक्षणासाठी आठ महिन्यांपासून आंदोलन, उपोषण करत आहे.
सरकारने सगेसोयऱ्यांबद्दलच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, विविध संस्थांचे गॅझेट स्वीकारावे यांसह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलो आहे. शासनाने आरक्षण मंजूर करावे. राजकारण माझा धर्म नाही, मात्र मागण्या मंजूर न झाल्यास सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार. उपोषण सुरू आहे तोपर्यंत सरकारने चर्चेसाठी यावे.
चर्चेची दारे उघडी आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजाचा रोष पत्करू नये.” दरम्यान, अंतरवाली सराटी येथे ग्रामपंचायतीने बैठक घेऊन काही ठराव मंजूर केले. यात जरांगेंच्या उपोषणाला सहा सदस्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.