पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची संध्याकाळी ७.२५ वाजता शपथविधी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातून महिलांमधून रक्षा खडसे यांना मंत्री पदाची संधी मिळू शकते, NDA सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु झाल्यापासून खा. रक्षा खडसे यांचं नाव चर्चेत आलं आहे.
महिलांमधून रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच पंकजा मुंडे यांनाही संधी दिली जाऊ शकते. डॉ.भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्रिमंडळात महिला चेहरा देतांना तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसेनां मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.
शपथविधी समारंभापूर्वी पंतप्रधा न मोदी सकाळी साडेसहा वाजता राजघाटावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सात वाजता माजी पंतप्रधान अटल बिहारवाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच सकाळी साडेसात वाजता वॉर मेमोरियलवर जाऊन शहिदांना अभिवादन केले.
शपथविधी समारंभाचे निमंत्रण शरद पवार यांना मिळाले आहे. शरद पवार सध्या मुंबईत आहेत. परंतु ते समारंभाला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण काँग्रेसला दिले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आजच्या शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. शपथविधी कार्यक्रमाला जायचे की नाही याबाबत काँग्रेस आजच निर्णय घेणार आहेत.