जळगाव,(प्रतिनिधी)- आत्मीया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस व विद्या प्रबोधिनी , जळगाव च्या माध्यमातून खाजगी शिक्षकांच्या बहुमोल कार्याची दखल दखल घेत खाजगी क्षेत्रातील शिक्षकांसाठी दिनांक १० रोजी शहरातील रिगल सिनेमा, नेहरु चौक, जळगाव येथे “ICONIC Mentor In Coaching Award 2024” हा प्रतिष्ठेचा सन्मान सर्वोत्कृष्ट शिक्षकांना प्रदान करणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली.या कार्यक्रमास आत्मीया एज्युकेशन मुंबईचे, संचालक डॉ. चिराग वाघेला यांची विशेष, उपस्थिती लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना आत्मीया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसचे रोहीत गोकाणी म्हणाले की,
भारतीय संस्कृतीतील उदात्त गुरुशिष्य परंपरेतील शिक्षक आजही हजारो शिष्यांना घडविण्यात स्वत:ला वाहून घेत आहेत.आजच्या विलक्षण प्रवाही स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अमर्याद संधी जागतिक स्तरावर उपलब्ध असतांना आजच्या शिक्षकांचा खरा कस लागतो.
विद्यार्थ्यांच्या यशात अनेक वाटेकरी असले तरी त्यामध्ये दुर्लक्षित राहतात ते खाजगी क्षेत्रातील शिक्षक, अहोरात्र मेहनत घेवूनही विद्यार्थ्यांच्या यशात त्यांची क्वचितच दखल घेतली जाते.
खाजगी क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे शिक्षकांना कायमच अष्टावधानी राहावे लागते, कोचिंग क्लासेस कडून अमर्याद अपेक्षा, शाळा कॉलेजेसमधील उपस्थिती कमी असल्यामुळे पालकांच्या प्रचंड अपेक्षा, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत ज्ञानात कुठेही मागे राहू नये म्हणून स्वतःचे ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी काटेकोर प्रयत्न, खाजगी क्षेत्रातील कमी अधिक प्रमाणातील असुरक्षितता, अशा अनेक विविध पातळ्यांवर खाजगी क्षेत्रातील शिक्षकांना आपले अस्तित्व कायम ठेवावे लागते व नुसतेच अस्तित्व कायम न ठेवता स्वतःला दररोज सिद्ध करावे लागते.
हिच जाणीव ठेवून आम्ही आत्मीया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस व विद्या प्रबोधिनी , जळगाव च्या माध्यमातून या पडद्यामागील गुरुंना प्रकाशात आणू इच्छितो, त्यांच्या बहुमोल कार्याची दखल सर्वांनीच घ्यावी हा प्रयत्न करु इच्छितो.
याच प्रयत्नांना मुर्त स्वरुप देण्यासाठी आम्ही सर्व खाजगी क्षेत्रातील शिक्षकांसाठी “ICONIC Mentor In Coaching Award 2024″ हा प्रतिष्ठेचा सन्मान सर्वोत्कृष्ट शिक्षकांना प्रदान करणार आहोत.
आत्मीया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस या संस्थेमार्फत आम्ही पैशांअभावी किंवा थोड्या मार्कांअभावी मेडिकल किंवा उच्च शिक्षणाची संधी गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करीत असतो, यामध्ये भारतातील आणि विदेशातील अमर्याद तसेच सर्वसामान्यांना माहिती नसलेल्या किंवा प्रवेश प्रक्रिया माहिती नसलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सहाय्य करण्यास नेहमी तत्पर असतो.
यासाठी उत्तर महाराष्ट्र स्तरावर कार्यरत नामांकित अशा “ विद्या प्रबोधिनी” या संस्थेचे श्री योगेश पाटील सर व त्यांच्या सर्व सहकारी टीमचे सहकार्य असते. इ. ५ वी ते १२वी पर्यंतचे “ विद्या प्रबोधिनी ” क्लासेस, “ प्रांगण” प्री -प्रायमरी शाळा, इ .१ ली ते १० वी पर्यंतच्या दर्जेदार शिक्षणासाठी ” नानासाहेब आर बी पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय”, इ . ११ वी ते १२ वी च्या शिक्षणासाठी “नानासाहेब आर. बी. पाटील ज्युनिअर कॉलेज”, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी “वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कूल”, आमोदा अशा अनेक विविध शैक्षणिक संस्था समूहाच्या माध्यमातून संचालक योगेश पाटील सर यांनी हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आह
तरी या कार्यक्रमाला खाजगी क्षेत्रातील शिक्षकांनी, खाजगी क्लासेसच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती द्यावी असे आवाहन आत्मीया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसचे संचालक रोहीत गोकाणी आणि विद्याप्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील यांनी केले आहे.