पाचोरा (राजेंद्र खैरनार) – भाजपा आयोजित युवा संमेलनानिमित्त देशाचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे जळगाव आले असता दि.5 मार्च रोजी पाचोरा शहरातील कृष्णापुरीतील भाजपा शहर सरचिटणीस असलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला म्हणजेच जगदिश पिराजी पाटील यांना विमानतळावर भेट घेऊन स्वागत करण्याची संधी मिळाली यामुळे भाजपात सामान्य कार्यकर्त्यालाही मोठा सन्मान मिळतो याचीच चर्चा होतांना दिसत आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा विमानतळावर जिल्ह्याभरातून पक्षाच्या विविध पदाधिकारी यांना स्वागत व सत्कार करण्याची संधी मिळाली यामध्ये पाचोरा शहरातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांचे खंदे समर्थक कृष्णापुरी येथील रहिवासी भाजपा सरचिटणीस पाचोरा शहर जगदीश पिराजी पाटील यांची देखील पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली व त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव विमानतळ येथे सत्कार करून जळगाव नगरीत स्वागत केले ही पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागासाठी एक अभिमानाची बाब असून पक्ष संघटनेमध्ये हिरारीने व चिकाटीने संघटनात्मक कार्य करणाऱ्या जगदीश पाटील यांचे पाचोरा शहरातून कौतुक केले जात आहे.
पक्षाशी एकनिष्ठ राहुन मनात कुठलाही प्रकारचा स्वार्थ व कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निरंतर मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांला नक्कीच योग्य ठिकाणी संधी मिळते याचे हे ज्वलंत उदाहरण समजले जाईल यावेळी जगदीश पाटील यांच्याशी संवाद साधला असता जगदीश पाटील हे एका पतसंस्था चे पिगमी एजंट म्हणून काम करत असून त्या माध्यमातून त्यांचा लोकांशी मोठा जनसंपर्क आहे व ते नेहमी विविध सामाजिक उपक्रमात देखील अग्रेसर असतात अशा या मितभाषी जगदीश पाटील यांची पक्षाप्रति असणारी एकनिष्ठता ही नक्कीच इतर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे