बीएसईचे (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) इयत्ता ९वी ते १२वीचे विद्यार्थी आता पुस्तके आणि नोट्स उघडून परीक्षा देऊ शकणार आहेत National Curriculum Framework नॅशनल क्युरीकुलम फ्रेमवर्कच्या (एनएफसी) शिफारसी अंतर्गत ही ओपन बुक एग्झाम (ओबीई) पायलट प्रोजेक्ट म्हणून याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू केली जाण्याची शक्यता आहे, दरम्यान अशी परीक्षा देण्याचा प्रयोग इतर काही देशांनी यापूर्वी केला असून भारतातसुद्धा हा प्रयोग यशस्वी होईल असे बोललं जात आहे.
एनएफसीचे म्हणणे आहे की, यामुळे विद्याथ्यांमधील परीक्षेबद्दलचा अनावश्यक तणाव, चिंता, भीती कमी होईल. दिल्ली विद्यापीठाने २०२० मध्ये अशी परीक्षा घेतली होती. मात्र, नंतर ती बंद करण्यात आली होती सुरुवातीला काही शाळांतच हा प्रयोग केला जाईल. नंतर तो देशभरात लागू केला जाईल अशी माहिती मिळत असली तरी लवकरच याबाबत स्पष्टात करण्यात येणारं आहे.