चाळीसगाव,(प्रतिनिधी): शहरातील मालेगाव रोडवरील बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालक व त्याच्या मित्राने तिला धमकी देत बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले असून १८ जानेवारी रोजी पीडित मुलीसोबत अत्याचार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीनं नातेवाईकांसह पोलीस स्टेशनं गाठलं
काम देण्याच्या बहाण्याने बोलावलेल्या १५ वर्षीय मुलीवर हॉटेलमालक आणि त्याठिकाणी उपस्थित असलेला त्याचा मित्र यांनी तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप दरम्यान घटना १८ जानेवारी रोजी घडली असली तरी याबाबतची माहिती पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनं गाठत पोलिस स्टेशनला शनिवारी दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस सहकाऱ्यांच्या मदतीने तातडीने महिलेसह तिघांना ताब्यात घेतले.