जळगाव – गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांचे चिरंजीव सौरभ पाटील यांना आज दिल्ली येथे सुरु असलेल्या प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया च्या परिषदेमध्ये प्रोफेशनल स्पीकर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या परिषदेमध्ये जगभरातील ३० देशांमधील तज्ज्ञांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आला असून मुंबई चाप्टर मधून त्यांना हा सन्मान मिळाला.
प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना जागतिक स्तरावर प्रोफेशनल भाषणे करण्यासाठी ज्या द्वारे इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील या करीता एक पीएसएआय (प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया) हि संघटना कार्यरत आहे. यात यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूके, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्वीडन, हॉलंड, बेल्जियम या 14 देशांच्या 14 राष्ट्रीय स्पीकिंग असोसिएशनची संघटना असलेल्या ग्लोबल स्पीकर ची आंतर राष्ट्र परिषद दिल्ली येथे सुरु आहे. या परिषदेमध्ये सौरभ सुभाष पाटील यांचाही सहभाग असून त्यांना मुंबई चाप्टरमधून स[स्पेशिअली ज्युरी पुरस्काराची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फौंडेशन च्या प्रेरणास्तोत्र गोदावरी आजी, अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सुषमा पाटील, सचिव वर्षा पाटील, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील, हृदयरोग तद्न्य डॉ वैभव पाटील, सौ इशिता पाटील, सीए सागर वायकोळे, सौ अस्मिता सौरभ पाटील आदींनी अभिनंदन केले.