नागरिकांनो सावधान…व्हिडीओ पाहा, पैसे मिळवा’ चे टाक्स देऊन जाळ्यात अडकवत नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूकीचे प्रकार घडत असतांना जळगावात टाक्स पूर्ण करण्याच्या नावाखाली एका महिलेची १२ लाखाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर असे की,शेअर चॅटवरील व्हिडीओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली संगीता प्रभाकर घोंगडे (४०, रा. धुळे) यांची १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता घोंगडे यांना १६ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी राजा ठाकूर व पट्टेश रिमाह नाव सांगणाऱ्या दोघांनी व्हॉट्सअॅप व कुशल, ज्योती, चंदेर असे नाव सांगणाऱ्यांनी टेलिग्राम या सोशल मीडियावर संपर्क साधला. त्यात त्यांना शेअर चॅटवरील व्हिडीओ पाहण्याचे टास्क दिले.त्यादरम्यान घोंडगे यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ४० हजार ५५० रुपये ऑनलाइन स्वीकारले. त्यापैकी ६८ हजार १२७ रुपये महिलेला परत दिले.त्यानंतर मात्र उर्वरित रक्कम परत न देता १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली.रक्कम परत मिळत नसल्याने संगीता घोंगडे यांनी जळगाव सायबर पोलिस दिली. ठाण्यात फिर्याद त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.