जळगाव,(प्रतिनिधी)- जळगांव जिल्हा पोलीस दलातील ६४ पोलीस अंमलदारांना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार या वरिष्ठ पदांवर पदोन्न्ती करण्यात आली आहे.
जळगांव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांची शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र अपात्रता तपासून पात्र अंमलदारांची निवडसूची तयार करुन रिक्त असलेल्या ३२ सहायक पोलीस उपनिरीक्षक व ३२ पोलीस हवालदार पदांवर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातील ३२ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदांवर पदोन्नती देण्यात आली असून ३२ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरील वेतनासह त्याअनुषंगाने लाभ मिळणार आहेत.
तसेच ३२ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदांवर पदोन्नती मिळाल्याने त्यांना त्याअनुषंगाने वेतनासह नियमानुसार आर्थिक लाभ मिळणार आहे. जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पदोन्नती झाल्याने पोलीस कर्मचारी यांचेमध्ये आंनदाचे वातावरण आहे. पदोन्नत झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे मा. पोलीस अधीक्षक जळगांव यांनी अभिनंदन केले असून पदोन्नतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच सदरहू पदोन्नती संदर्भातील कामकाज पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक श्री प्रविण पवार, श्री सुनिल निकम, श्री देविदास बाविस्कर यांनी उत्कृष्ठ पद्धतीने केल्याबद्दल त्यांचे मा. पोलीस अधीक्षक यांनी व जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.