पाचोरा (किशोर रायसाकडा)- पाचोरा जवळ असलेल्या गोराडखेडा गावाजवळ भरधाव स्विफ्टकार चालकाने रस्त्यावरील चार जणांना उडवल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज घडली आहे. यात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत असून दोन जण गंभीर जखमी आहेत.दरम्यान ज्या वाहनाने उडविले त्या वाहणातून प्रवास करणारे ५ जण पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघातानंतर जमलेल्या संतप्त जमावणे त्या चारचाकी वाहनाला पेटवून दिल्याचे समजते.
मयत झालेल्यामध्ये एक शाळकरी मुलीचा आणि एक वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही जखमींना तात्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना केले असून घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
याबाबत प्राप्त माहीती अशी की, गुरुवारी सायंकाळी ५:४५ वाजेच्या दरम्यान शाळेतुन मुले घरी येत असतांना, शेतातुन शेतकरी शेतमजुर घरी येत असतांना पाचोर्याकडन लाल कलरची स्विप्ट डिझायर ही गाडी भरधाव वगाने जळगाव कडे जात असतांना गोराडखेडा गावाच्या जवळ या कारने चौघांना उडविले.
याप्रसंगी पी. के.शिंदे शाळेत ९वी त शिक्षण घेणार्या दुर्वा भागवत पाटील (वय १५), ऋतुजा राजु भोईटे (वय १५) या सायकलीवर घराकडे येत होते. तर, सुभाष रामा पाटिल(६०) व परशुराम दगा पाटिल(५२) या चारही जणांना या कारने उडविले. या चौघांना चिरडत गावाजवळ ही कार थांबली. यात परशुराम पाटील यांना वहानासह गाडीत अडकल्याने गाडी थांबली.
अपघाताची ही घटना इतकी भिषण होती की,काही कळण्याच्या आतच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील हे जागीच ठार झाले.गावकर्यांनी गाडीने उडून दिलेल्यांना रस्त्यालगतच्या शेतातन अचलून आणण्या अगोदरच जळगाव कडुन येणार्या पोलीस गाडीने गाडीत बसलेल्या तरूणांना तत्काळ पाचोरा पोलिसात आणले. दरम्यान परशुराम पाटिल यांना उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले असुन ऋतुजा राजु भोईटे या मुलीला पाचोर्यात उपचार सुरू आहे.