Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक याच्या मृत्युनंतर जर जोडीदार जिवंत असेल तर त्या जोडीदाराला कुटुंब निवृत्तीवेतन… नियमात सुधारणा

najarkaid by najarkaid
January 2, 2024
in राष्ट्रीय
0
सरकारी कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक याच्या मृत्युनंतर जर जोडीदार जिवंत असेल तर त्या जोडीदाराला कुटुंब निवृत्तीवेतन… नियमात सुधारणा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी –  2024सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम 2021 मधील 50 व्या नियमाच्या उपनियम(8) आणि उपनियम (9) मधील तरतुदींनुसार, सरकारी कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक याच्या मृत्युनंतर जर जोडीदार जिवंत असेल तर त्या जोडीदाराला कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याचा हक्क प्राधान्याने मिळतो आणि त्या जोडीदाराच्या मृत्यूनंतरच किंवा हे कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास जोडीदार अपात्र ठरल्यास नंतर मृत सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारकाची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पात्र ठरतात.

एखादी महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिला तिच्या पतीऐवजी पात्र अपत्य किंवा एकाहून अधिक अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी नामनिर्देशित करू शकते का याबाबत सल्ला मागणाऱ्या विनंत्या केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्याकडून मोठ्या प्रमाणात केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाकडे केल्या जात होत्या. विशेषतः वैवाहिक विसंवादातून न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज सादर केला आहे किंवा घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल झाली असेल तर अशा वेळी संबंधित महिलेसाठी उपरोल्लेखित सुविधेची तरतूद आहे काय अशी विचारणा या विभागाकडे वारंवार होत होती.

त्याबरहुकूम, आंतर-मंत्रालयीन चर्चांनंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेच्या संदर्भात न्यायालयात घटस्फोटाची कार्यवाही प्रलंबित असेल किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेने / निवृत्तीवेतनधारक महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली असेल तर अशा सरकारी कर्मचारी महिलेला / निवृत्तीवेतनधारक महिलेला तिच्या मृत्युनंतर मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन तिच्या पतीऐवजी तिच्या पात्र अपत्याला अथवा एकाहून अधिक अपत्यांना मिळावे अशी विनंती ती करू शकते. अशा प्रकारची विनंती खालील पद्धतीने विचारात घेता येईल:

सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम 2021 मधील 50 व्या नियमाच्या उपनियम(8) आणि उपनियम (9) मधील तरतुदींनुसार, सरकारी कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक याच्या मृत्युनंतर जर जोडीदार जिवंत असेल तर त्या जोडीदाराला कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याचा हक्क प्राधान्याने मिळतो आणि त्या जोडीदाराच्या मृत्यूनंतरच किंवा हे कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास जोडीदार अपात्र ठरल्यास नंतर मृत सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारकाची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पात्र ठरतात.

एखादी महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिला तिच्या पतीऐवजी पात्र अपत्य किंवा एकाहून अधिक अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी नामनिर्देशित करू शकते का याबाबत सल्ला मागणाऱ्या विनंत्या केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्याकडून मोठ्या प्रमाणात केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाकडे केल्या जात होत्या. विशेषतः वैवाहिक विसंवादातून न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज सादर केला आहे किंवा घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल झाली असेल तर अशा वेळी संबंधित महिलेसाठी उपरोल्लेखित सुविधेची तरतूद आहे काय अशी विचारणा या विभागाकडे वारंवार होत होती.

त्याबरहुकूम, आंतर-मंत्रालयीन चर्चांनंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेच्या संदर्भात न्यायालयात घटस्फोटाची कार्यवाही प्रलंबित असेल किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेने / निवृत्तीवेतनधारक महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली असेल तर अशा सरकारी कर्मचारी महिलेला / निवृत्तीवेतनधारक महिलेला तिच्या मृत्युनंतर मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन तिच्या पतीऐवजी तिच्या पात्र अपत्याला अथवा एकाहून अधिक अपत्यांना मिळावे अशी विनंती ती करू शकते. अशा प्रकारची विनंती खालील पद्धतीने विचारात घेता येईल:

  1. जेथे एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेच्या / निवृत्तीवेतनधारक महिलेच्या संदर्भात सक्षम न्यायालयात घटस्फोटाची कार्यवाही प्रलंबित असेल किंवा किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेने / निवृत्तीवेतनधारक महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत अथवा हुंडा प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली असेल तर अशा सरकारी कर्मचारी महिलेचा / निवृत्तीवेतनधारक महिलेचा वरीलपैकी कोणतीही कार्यवाही प्रलंबित असताना दरम्यानच्या कालावधीत मृत्यू झाल्यास मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन, तिच्या पतीऐवजी तिच्या सक्षम अपत्याला/ एकाहून अधिक अपत्यांना मिळावे अशा अर्थाची लेखी विनंती तिला संबंधित मुख्य कार्यालयात करावी लागेल;
  2. उपरोल्लेखित कार्यवाही प्रलंबित असताना, महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेचा मृत्यू झाल्यास आणि मृत्युपूर्वी तिने वरील मुद्दा क्र.a मध्ये म्हटल्यानुसार लेखी विनंती केलेली असल्यास, कुटुंब निवृत्तीवेतन खालील पद्धतीने वितरीत केले जाईल:

    1. जेथे मृत्यू पावलेली महिला सरकारी कर्मचारी / महिला निवृत्तीवेतन धारकाच्या मागे विधुर पती आणि सज्ञान झालेले अपत्य/अपत्ये असतील आणि ती अपत्ये कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पात्र ठरत असतील तर हे कुटुंब निवृत्तीवेतन त्या अपत्याला/अपत्यांना देण्यात येईल.
    2. जर उपरोल्लेखित मुद्दा क्र.(ii) आणि (iii) मध्ये वर्णन केल्यानुसार अपत्य/अपत्ये सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम,2021 मधील 50 व्या नियमानुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरत नसतील तर अशावेळी कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र एक किंवा अधिक अपत्य असल्यास हे कुटुंब निवृत्तीवेतन त्याला/त्यांना द्यावे लागेल.
    3. सर्व अपत्ये सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम,2021 मधील 50 व्या नियमानुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरत नसतील तर अशावेळी त्या विधुराला त्याच्या तहहयात किंवा पुनर्विवाहापर्यंत हे कुटुंब निवृत्तीवेतन देय राहील.

ही सुधारणा अत्यंत प्रागतिक असून महिला कर्मचारी/निवृत्तीवेतनधारक यांना लक्षणीयरित्या सक्षम करणारी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘डीपीडीसी’चे सर्व प्रस्ताव तातडीने सादर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बॅनर शहरात चर्चेचा विषय

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ ;  ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बॅनर शहरात चर्चेचा विषय

यंदा अकोल्यात 'नया साल, नया खासदार' ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बॅनर शहरात चर्चेचा विषय

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us