Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे

najarkaid by najarkaid
December 21, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २१ प्रतिनिधी – ‘प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा आणि फिल्डवर येऊन जिवंत पिकं बघावी.’ असे आवाहन जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

जैन हिल्स वर १० जानेवारी २४ पर्यंत सुरू असलेला हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषि महोत्सवात शेतकऱ्यांसोबत रविशंकर चलवदे यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. तंत्रज्ञानातून पिकपद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे करता येतील हे अनुभवले. त्यांच्यासोबत आत्मा जळगावचे उपसंचालक श्री. साळवे, जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ संजय सोनजे, डॉ. विकास बोरोले यांच्यासह कृषीतज्ज्ञ होते.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची प्रत्यक्ष फिल्ड पाहणीसाठी ते आले होते. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांसोबतच चर्चा करताना इतर शेतकऱ्यांनीही या महोत्सवात सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी सांगितले की, ‘एकाच ठिकाणी वेगवेगळे पिकांची लागवड जैन हिल्स कृषि महोत्सवात दिसून आली. यात केळी हे आपल्या भागातील प्रमूख पिक आहे. आर्थिक चलनवलन यापिकातून मोठ्याप्रमाणात होत असते. त्यात सात ते आठ प्रकारची केळी लागवड, ठिबक व बेडवर लागवड, आठ महिन्यात आलेले पिक, ३० फूट उंचीचे केळीचे पिक अशी एकाच ठिकाणी विविध केळी पिकांची लागवड बघायला मिळत असल्याचे ते म्हणाले. यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजून घेता येत आहे. तंत्रज्ञानासोबतच कुठले पिक घ्यावे, कसे घ्यावे, कुठली व्हरायटी लावावी असे एकच ठिकाणी वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे ते म्हणाले. शिवाय हळद, अद्रक, टॉमोटो व कांदा सारख्या पिकांमध्ये समृद्धी मार्ग आहे. ह्यासंबंधीत अनेक व्हरायटीची माहिती याठिकाणी मिळते. कांदा हे आपल्या भागातील प्रमूख पिक घेतले जाते त्यात प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरा लाल कांद्यासह अन्य जातींचाही पिकांची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांना करता येत आहे. पांढऱ्या कांद्याच्या करार शेतीतून हमी भावाने कांदा व टमोटो खरेदी करून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल जात आहे. असे अनेक प्रकारांसह फळबागांमध्ये डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, लिंबू, पपई यासह अन्य फळपिकांची लागवड पद्धतीमध्ये बदल केला आहे.

अतिसघन लागवड पद्धतीतून शेतकऱ्यांना कमी जागेत, कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा मार्ग मिळत आहे. सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक, तुषार सिंचनासह अन्य पद्धतींसह ज्यांच्याकडे ५० ते १०० किंवा त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रामध्ये जैन ऑटोमेशन पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. यातून सिंचनासह फर्टिगेशन यंत्रणाद्वारे खतांचे नियंत्रण ठेवता येते व मजूरीवरील अतिरीक्त खर्च कमी करता येतो. एकाच ठिकाणी हे सर्व तंत्रज्ञान बघायला मिळत आहे. प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगाव सह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा. फिल्डवर येऊन जिवंत पिकं बघायला मिळत आहेत. दिवसभर जैन हिल्सच्या संशोधन विकास केंद्राचे प्रक्षेत्र भेट द्यावी, व्यवस्थेच्यादृष्टीने नोंदणी करावी’ असे आवाहनही जळगाव आत्माचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

Next Post

बाळासाहेब आंबेडकरांवर घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी ; काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना वंचितचे थेट आव्हान

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
बाळासाहेब आंबेडकरांवर घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी ; काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना वंचितचे थेट आव्हान

बाळासाहेब आंबेडकरांवर घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी ; काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना वंचितचे थेट आव्हान

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us