राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या अनेक आमदारांसह बंडखोरी करत महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांनी आज रविवारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर दावा केला असून 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय राज्याच्या विकासासाठी आपण शिवसेनेसोबत (उद्धव ठाकरे) सरकार बनवू शकलो तर भाजपसोबतही सरकार स्थापन करू शकतो. असेही अजित पवार म्हणाले.
हे पण वाचा..
राजकीय घडामोडींवर पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता ; जेवढे गेले त्यातील 80 टक्के आमदार परत येणार
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी : अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ?
अजित पवारांसोबत कोणी कोणी घेतली शपथ? वाचा ..
यावेळी पपई खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे ! घ्या जाणून..
तसेच आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही माझयाकडे आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीवर दावा करत अजित पवार म्हणाले की, पुढची निवडणूक आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढू. आगामी काळात आणखी अनेक चेहरे मंत्रिमंडळात सामील होणार असल्याचे पवार म्हणाले. उद्या आणखी काही आमदार मुंबईत पोहोचणार आहेत. आज आपण सर्वांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेत्याने राजीनामा दिला होता.
ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या स्थापना दिनी मी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांसमोर माझे मत मांडले होते. आगामी काळात युवा नेतृत्वाला संधी दिली जाईल. आमच्या निर्णयाबद्दल काही लोक वेगवेगळी विधाने करतील, पण आम्हाला या सगळ्याशी काही देणेघेणे नाही. महाराष्ट्राचा विकास आपल्यासाठी प्रथम आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही कार्यरत राहू. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमचे बहुतांश आमदार आमच्या निर्णयावर समाधानी आहेत. आम्ही सर्व निवडणुका राष्ट्रवादीच्या नावावर लढवू.