जळगाव । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच जळगाव उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाला शासनाने आता प्रादेशिक परीवहन कार्यालयाचा दर्जा दिला आहे. त्याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
राज्यातील एकूण 9 उपप्रादेशिक परीवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) आणि सातारा येथील उप प्रादेशिक परीवहन कार्यालयांच्या दर्जामध्ये वाढ करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.
हे पण वाचा..
बँक खाते उघडण्याच्या नियमात होणार मोठा बदल ; जाणून घ्या काय आहे सरकारची नवी तरतूद?
सुट्टी न मिळाल्याने झाली नाराज ; थेट डेप्युटी कलेक्टर पदाचाच राजीनामा दिला
राष्ट्रवादीचा प्रस्ताव ! एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवावी, पण कुठून??
आमदार महिलेला घेऊन हॉटेलवर पोहोचला, तितक्यात मागून नवरा आला अन्.. VIDEO व्हायरल
जळगावात सध्या उपप्रादेशिक परीवहन कार्यालय आहे. ते धुळे प्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या अखत्यारीत आहे मात्र आता स्वतंत्र प्रादेशिक परीरवहन कार्यालय होणार आहे. महसुली विभागाप्रमाणेच राज्यातील सहा विभागीय कार्यालयातील उपायुक्तांनादेखील सहआयुक्तांचा दर्जा देण्यात आला आहे.
दरम्यान, सप्टेंबर 2022 मध्ये जळगाव उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाऐवजी आता आरटीओ अर्थात प्रादेशिक परीवहन कार्यालय मंजूर केले होते. त्यानुसार आता संबंधित प्रादेशिक परीवहन अधिकारी यांना उपरोक्त नमूद प्रादेशिक परीवहन कार्यालयांचे कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे.