जळगाव । जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दाद ठोठावला आहे. खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने एकनाथ खडसेंना 500 रुपयाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, यापूर्वी गुलाबराव पाटील गैरहजर राहिल्याने त्यांनाही 500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
हे पण वाचा..
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1500 कोटीचा निधी वितरित होणार : कोणत्या जिल्ह्याला किती मदत?
गूळ, तांदूळ, तीळ अन् हिरा..! पीएम मोदींनी आपल्या भेटवस्तूंनी जिंकलं जो बिडेनचं मन
लाज सोडली! मेट्रोत कपलचा लिपलॉक किस करतानाचा VIDEO व्हायरल
नेमकं प्रकरण काय?
विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांनी 2016 एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात कोणतेही तथ्य नसताना आपल्यावर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे आपली समाजात प्रतिमा मलिन झाली, बदनामी झाली असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जळगाव न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
या दाव्याची काल झालेल्या सुनावणी दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने पाचशे रुपये दंड केला होता. तर दावा करणारे एकनाथ खडसे देखील बुधवारच्या गैरहजर राहिल्यामुळे त्यांनाही न्यायालयाने 500 रुपयांचा दंड केला आहे.