द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते आणि तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली, त्यानंतर जबरदस्त ‘नाटक’ पाहायला मिळाला. अटकेनंतर व्ही सेंथिल बालाजी ढसाढसा रडले आहे. मात्र यानंतर त्यांनी छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ओमंडुरार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
https://twitter.com/ANI/status/1668737885242286080
सेंथिल बालाजी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागले. त्यांच्या सखोल चौकशीनंतर आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्याने व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केली. अधिकारी जसेही सेंथिल यांना घेऊन जायला निघाले, त्याक्षणी सेंथिल यांनी हंबरडाच फोडला.
सेंथिल बालाजी यांचा रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णालयात घेऊन जात असताना मंत्री बालाजी रडत असताना दिसले. सध्या सेंथिल बालाजी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सेंथिल बालाजी यांची प्रकृती बिघडल्यानंतर डीएमकेच्या सर्व मंत्र्यांची रुग्णालयाबाहेर त्यांना भेटण्यासाठी रांगा लागल्या आहेत. दरम्यान, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत बालाजी यांना अटक करण्यात आले. अटकेनंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. ईडी न्यायालयाकडे त्यांच्या कस्टडीची मागणी करु शकते.