पाचोरा, (प्रतिनिधी)- आळंदी येथे वारकरी सांप्रदायाच्या भक्तांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मा. आ. दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला. दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना देण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी मा. आ. दिलीप वाघ, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख,माजी शहराध्यक्ष रणजित पाटील, तालुका अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, रा. काॅं. युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, बाजार समितीचे संचालक विजय पाटील, शांताराम चौधरी, अशोक सोनवणे, हरिष पाटील, अॅड. अविनाश सुतार, सत्तार पिंजारी, बाबाजी ठाकरे, शेख अन्वर शेख शब्बीर, सतिष देशमुख सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वारकरी संप्रदायांच्या भक्तांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राची गेल्या शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. हजारो खेड्या – वस्त्यांमधून लाखो वारकरी दरवर्षी विठोबाच्या दर्शनास पंढरपूर येथे पायी दिंडीच्या वाऱ्या करून जातात. यापूर्वी या सर्व दिंड्या अतिशय भक्तीभावाने अनुचीत प्रकार न घडता संपन्न होत आले आहेत. सर्वधर्मीय, सर्वपंथीय, लोक या दिंडीच्या वारकऱ्यांची गावोगावी सेवा करित असतात. सर्व दैनंदिन सोई सुविधा भक्तांना उपलब्ध करून देतात. जगात दरवर्षी अशी सेवाभावी वृत्ती कुठेच पाहायला मिळत नाही. पायी दिंडी हजारो भक्तांचा सहभाग, शिस्त, हरीजणांचा गजर, कीर्तन, पंढरीच्या विठोबा प्रती प्रचंड भक्तीचे प्रदर्शन असा हा दिंडी सोहळा भारतातील जनतेचे नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेणारा असतो. अशा या वारकऱ्यांवर कुणीतरी भोसले नावाचा नकली भक्त ज्याचा वारकरी संप्रदायाच्या विचारांशी, भक्तीभावांशी, काहीच संबंध नाही.
. तो दिंडीत हस्तक्षेप करून धुडघूस घालणाऱ्या योजनेचे नेतृत्व करतो. ही अतिशय निंदनीय, अशोभनीय आणि वारकऱ्यांच्या परंपरेला आणि स्वाभिमानाला अपमानाचा धक्का पोहचवणारी बाब आहे. सत्ताधारी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ह्या घटनेच थातूरमातुर उत्तर देऊन समर्थन करतात. ही बाब देखील विद्यमान सरकारसाठी लाच्छनास्पद आहे. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पाचोरा – भडगाव तर्फे या वारकरी हल्लाप्रकरणी तीव्र निषेद नोंदवत संबंधित व्यक्तीला ताब्यात घ्यावे. हल्ला करणाऱ्या पोलिसांना त्वरित निलंबित करावे. सर्व जबाबदार
लोकांवर खटले दाखल करून योग्य कारवाई करण्यात यावी. अशा आषयाचे निवेदन पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसिलदार यांना देण्यात आले.