पारोळा । अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नसून अशातच पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. वारंवार अत्याचार करून १५वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयताला अटक करण्यात आले आहे.
पारोळा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गावात राहणारा संशयित आरोपी प्रवीण राजेंद्र सपकाळे (वय २२)याने पीडित मुलीसोबत घरी एकटी असताना तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितलं तर तुझ्या बहिणीवर सुद्धा अत्याचार करेल अशी धमकी दिली होती.
हे पण वाचा..
जळगाव जिल्ह्यातील जवानाला आसाममध्ये वीरमरण
सामान्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना! वार्षिक फक्त 436 रुपये भरा, 2 लाखांपर्यंतचा मिळेल लाभ
निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली 3 लाखांची भेट! आता खात्यात पैसे येतील
धक्कादायक! मंत्रीपद मिळेल, पण.. राज्यातील ६ आमदारांना घातला कोट्यवधींचा गंडा
दरम्यान १६ मे रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तिची डॉक्टरांकडे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे धक्कादायक माहिती समोर आले. या संदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रवीण राजेंद्र सपकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयताला अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव करीत आहे.