जळगाव । मागच्या चार दिवसांत राज्याचा पारा तापल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून राज्यातील सर्वात उच्चांकी तापमान भुसावळ येथे नोंद झाली आहे. हॉटसिटी भुसावळात वैशाख वणवा पेटला आहे. शुक्रवारी शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 45.7 अंश तापमानाची नोंद केंद्रीय जल आयोगाने केली आहे.
हे पण वाचा..
कर्नाटकचे सुरुवातीचे कल आले ; काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजपला मोठा धक्का?
१३ मे रोजी या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल ; काय म्हणते आज तुमची राशी?
12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी.. BSF मध्ये 247 पदांवर बंपर भरती ; असा करा अर्ज
एप्रिल महिन्याच्या अखेरीस भुसावळातील तापमानाचा पारा 36 अंशांपर्यंत घसरला होता. तर गेल्या रविवारी (दि.07) तापमान 40.5 अंशांवर होते. सोमवारपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सलग पाचव्या दिवशीही शहराचे तापमान 42 अंशांवर पोहोचले आहे. काल (दि.12) शुक्रवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 45.7 अंशांवर पोहोचले.
आज (दि.13) राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते.