जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलाय. ऐन लगीन सराईत सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठल्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
काय आहे सोन्याचा आजचा दर?
सोन्याचे दर जीएसटीसह 63 हजार 200 ते 300 रुपये प्रति तोळा पर्यंत विकले जात आहे. गेल्या आठवड्यातील गुरुवारी सकाळी सराफ बाजारात व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर सोन्याने जोरदार उसळी नोंदवली. त्यादिवशी सोने दरात ऐतिहासिक वाढ नोंदविली गेली होती. दरवाढीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत सोने अजून वधारण्याची शक्यता आहे.
चांदीचा दर
सोन्याच्या किमतीसह चांदीच्या किमतीने देखील नवीन उच्चांक गाठला आहे. पण उच्चांकापासून चांदीच्या किमतीत घसरण दिसून येतेय. गुरुवारी चांदीचं किमतीने विनाजीएसटी 77,800 रुपयापर्यंतचा टप्पा गाठला होता. मात्र आज चांदीचा एक किलोचा दर 76,800 रुपयापर्यंत आहे.
हे पण वाचा..
मोठी घोषणा..! शासकीय ITI विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये
शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा! देशभरात ‘हा’ नवीन नियम झाला लागू, काय आहे आताच जाणून घ्या?
Video : भीषण दुर्घटना! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतांश मुले
जागतिक पातळीवर बँकाच्या व्याज दरात सातत्याने होत असलेलं बदल यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार हे सोन्याकडे वळू लागल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे सोने व्यावसायिक सांगत आहेत.