जळगाव : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, ज्याद्वारे दररोज सुमारे लाखोंच्या संख्येचे लोक प्रवास करतात. दरम्यान, भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक रंजक तथ्य आहेत, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत, जे दोन राज्यांमध्ये बांधले गेले आहे.
या अनोख्या रेल्वे स्थानकाचे नाव नवापूर रेल्वे स्थानक आहे. हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. या स्टेशनचा अर्धा भाग गुजरातच्या तापी जिल्ह्यात आणि दुसरा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात बांधला आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्रांतर्गत येते. या स्थानकाच्या सर्व गोष्टी दोन राज्यांमध्ये विभागल्या आहेत. स्टेशनच्या मध्यभागी एक रेषा काढण्यात आली असून एका बाजूला महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला गुजरात आहे.
स्टेशन महाराष्ट्र-गुजरात मध्ये विभागलेले आहे
नवापूर रेल्वे स्थानकावरही एक बेंच आहे, त्यातील अर्धा भाग गुजरातमध्ये आणि अर्धा महाराष्ट्रात येतो. बेंचच्या दोन्ही बाजूला महाराष्ट्र आणि गुजरात असे स्पष्टपणे पेंटने लिहिले आहे. या स्थानकात येणारे अनेक लोक या बाकावर बसून त्यांचे फोटो काढतात. यासोबतच स्टेशनवर एक सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला आहे, जिथे दूरवरून लोक त्यांचे फोटो क्लिक करतात.
स्थानकावर 4 प्लॅटफॉर्म बांधले आहेत
या अद्वितीय रेल्वे स्थानकाची एकूण लांबी 800 मीटर आहे. त्यापैकी सुमारे 500 मीटर गुजरात आणि उर्वरित 300 मीटर महाराष्ट्रात येतात. या रेल्वे स्थानकावर 4 रेल्वे ट्रॅक आणि 3 प्लॅटफॉर्म आहेत. विशेष म्हणजे नवापूर रेल्वे स्थानकाची तिकीट खिडकी महाराष्ट्राच्या हद्दीत येते, तर स्टेशन मास्तर गुजरातच्या हद्दीत बसतात.
घोषणा 4 भाषांमध्ये होते
या स्थानकावर (नवापूर रेल्वे स्थानक) 1-2 नव्हे तर 4 भाषांमध्ये उद्घोषणा केली जाते. येथे प्रवाशांसाठी हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती भाषेत घोषणा दिल्या जातात. एवढेच नाही तर रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या माहितीचे फलकही या चार भाषांमध्ये लिहिलेले आहेत, जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.
स्टेशनचा मनोरंजक इतिहास
नवापूर रेल्वे स्थानकाचे दोन राज्यांमध्ये विभाजन कसे झाले यामागेही एक रंजक कथा आहे. वास्तविक हे स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरातच्या फाळणीपूर्वी बांधले गेले होते. पण 1 मे 1961 रोजी मुंबई प्रांताचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले. या विभाजनाअंतर्गत नवापूर रेल्वे स्थानकही दोन राज्यांमध्ये अर्ध्या भागात विभागले गेले. तेव्हापासून या रेल्वे स्थानकाची वेगळी ओळख बनली आहे.