मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा त्याग करणार असल्याचे पवार म्हणाले. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले,”राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे. या वयात मला हे पद भूषवायचे नाही. दुसरे कोणीतरी पुढे यावे असे वाटते. संघटनेच्याबाबत पुढं काय करायचं याबाबत मी एक समिती करणार असून यात सदस्य निर्णय घेतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा. मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळ पर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो”.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर येत असतानाच शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह भाजप सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या येत होत्या.
















