जळगाव : राज्यात अद्याप अवकाळीचे संकट कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून पुढचे चार दिवस जळगाव जिल्ह्याला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे बुधवार आणि गुरुवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरही शनिवारपर्यंत अहमदनगर आणि पुणे येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे.
Rain/thundershowers with possibility of hail very likely at isolated places over parts of Maharashtra during next 4-5 days . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट द्यI pic.twitter.com/h0YHLwAS8Z
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 25, 2023
नाशिक व्यतिरिक्त सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथेही बुधवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात या आठवड्यात सातत्यपूर्ण पाऊस आहे. परभणी, हिंगोली, नांदेड येथे गुरुवारीही ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. विदर्भात अवकाळीची तीव्रता अधिक असून गारपीटीचीही वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही बुधवार आणि गुरुवारी गारपीटीची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.