मुंबई : राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. यात एक महत्वाची म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गातील होतकरु व बुध्दिमान विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, तांत्रिक व रोजगारभिमुख शिक्षणाद्वारे त्यांचे सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्याच्या दृष्टिकोनातून राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यांत येत आहे.
या योजनेंतर्गत व्यवसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम (जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधी) करिता जास्तीत जास्त एकूण 5 लाखापर्यंत द.सा.द.शे. 3 टक्के व्याज दराने देण्यात येते. या योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
योजनेसाठी आवश्यक अटी :
अर्जदार अल्पसंख्यांक समाजातील असावा. मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिष्ट व जैन समाजाचा समावेश.
अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
वयोमर्यादा किमान १६ ते ३२ वर्षे असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी १ लाख ३ हजार रुपयांपेक्षा कमी,
ग्रामीण भागासाठी ८१ हजारांपेक्षा कमी.
आवश्यक कागदपत्रे :
विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या २ प्रती अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
● महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
● आधार कार्ड
● मतदार ओळखपत्र
● पारपत्रक
● बँकेचे पासबुक
● ड्रायव्हिंग लायसन्स
● पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक
● उत्पन्न प्रमाणपत्र : कुटुंबप्रमुखाच्या नावे तहसीलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/ शासकीय व खासगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म क्रमांक १६.
● विहित नमुन्यातील अर्जदार/जामीनदाराचे हमीपत्र
● बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र
लाभाचे स्वरूप असे : २ लाख ५० हजारापर्यंत कर्ज स्वरूपात दिले जातात.
व्याजदर : ३ टक्के
परतफेड : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्यांपासून पुढील ५ वर्षे
या ठिकाणी संपर्क करावा :
▪ अल्पसंख्याक विकास व आर्थिक महामंडळ जिल्हा कार्यालय.
▪ मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)