मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतिर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शपथविधीसाठी बोलावलं जाणार असल्याची माहिती आहे. शिवाजी पार्कात तब्बल ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर एका मोठ्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसाठी खुर्च्या लावण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शपथविधीला यावं यासाठीही प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.