जळगाव,(प्रतिनिधी)- गर्व से कहो हम हिंदू है… हे आपण जे आज गर्वाने म्हणत आहोत ते राजपुतांच्या तलवारीमुळेचं… असा प्रतिभावंत इतिहास राजपुतांचा आहे.राजपूत समाज नेहमीच या देशाशी प्रामाणिक राहिला आहे, देशाप्रति गद्दारी करणाऱ्या विरुद्ध राजपुतांची भूमिका राहिली असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी राजपुतांना प्रीमियम लीग 2023 च्या समारोप प्रसंगी केले.यावेळी विजेता BH खंडाळकर 11 तर उपविजेता श्री साई ग्रुप चा संघ ठरला.या राजपूत प्रीमियम क्रिकेट लीगचे मुख्य प्रायोजक म्हणून श्री. राजपूत करणी सेनेचे प्रविणसिंग पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की राजपुतांच्या तलवरीने प्रामाणिक पणे इमानदारीने स्वतःची काळजी न करता न्यायासाठी लढली, ज्या ज्या वेळी या राष्ट्रावर देशावर परकीयांचं आक्रमण झालं, देशाची आर्य वैदिक हिंदू सनातन संस्कृतीला बदनाम करण्याची कोशिश झाली,या देशाचे संस्कार, संस्कृती परंपरा यावर आघात झाला त्या त्या वेळी त्या आक्रमणाचा विरोध राजपुतांनी केल्याचा इतिहास आहे.राजपूत समाजाने संघटित व्हावे, एकत्रित येण्यासाठी ज्या गोष्टी नडत असतील त्या सोडा पण संघटित व्हा,असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय क्षेत्रीय महासभेचे अध्यक्ष राजेंद्रसिहं राजपूत, डॉ. सुरेश सिहं सूर्यवंशी, श्री. राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविणसिहं पाटील, प्रा. डॉ. नरसिहं बघेल, प्रा. विश्वजितसिहं सिसोदिया, प्रा. डॉ.राजेंद्रसिहं कॅप्टन,काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाप्रमुख महेंद्रसिंह राजपूत, श्री. राजपूत करणी सेनेचे विभागीय कार्यध्यक्ष विलाससिहं पाटील, बापूसिहं राणा, विठ्ठलसिहं मोरे, बी. एच. खंडाळकर, संदीपसिहं ठाकूर, संदीपसिहं राणा, अजयसिहं राणा संग्रामसिहं सूर्यवंशी, चंद्रशेखरसिहं राजपूत, पृथ्वीराज फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेशसिहं राजपूत, विश्राम पाटील, नरेंद्रसिह पाटील, विशाल भोळे, अशोक लाडवंजारी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, गोपीसिहं राजपूत, किरणसिहं राजपूत, नितीन पाटील, संदीप राणा, रोशनसिहं राजपूत, मयूरसिहं राजपूत, अतुलसिहं राजपूत यांची उपस्थिती होती.
प्रविणसिहं पाटील समाज भुषण पुरस्काराने सन्मानित
श्री. राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘समाज भुषण पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी महामंडलेश्वर स्वामी श्री. जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हे होते संघ मालक…
बी. एच.खंडाळकर,डॉ दिनेशसिंग पाटील, भोजराज राजपूत, लखीचंद राजपूत, संग्रामसिंह सुर्यवंशी, मुन्ना सिंग राजपूत, मुकेश सिंग, मनिषसिंग परदेशी,गणेश पाटील,प्रविणसिहं पाटील,सुमितसिंग पाटील, नरेंद्रसिहं पाटील,नरेंद्रसिंग पाटील,मयूर पाटील,राजू पाटील, पंकजसिंह बैस, डॉ अनिकेतसिंग पवार,प्रविणसिंह पाटील
आरपीएल समिती
संग्रामसिंह सुर्यवंशी, अतुलसिंग राजपूत,गणेश पाटील, रतनसिंग पाटील,,प्रविणसिंह पाटील,तेजस पवार, रोशनसिंग राजपूत,विठ्ठलसिंग राजपूत,कृपालसिंग ठाकूर,चंद्रशेखर राजपूत, धनंजय परदेशी,रवी पाटील,निलेश पाटील किरण राजपूत राहुल पाटील,अॅड स्वप्नील पाटील,अॅड योगेश पाटील,राहुल ठोक
यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविक विश्वजीत सिसोदिया सर यांनी केले तर श्री राजपूत करणी सेनेच्या कार्यावर विलाससिहं राजपूत यांनी प्रकाशझोत टाकला. दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अय्याज द इंडियन यांनी केले.