जळगाव : चक्रीय वार्याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे. आज अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. दरम्यान, आज (दि. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट (Weather Forecast देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात पुढील 4 दिवस,येथे दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चित्र 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे 7 एप्रिल रोजी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.कृपया IMD कडील सूचना पहा.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/107Yki0Jry
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 6, 2023
राज्यात एकीकडे तापमान वाढत असताना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा संकट आला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर सकाळपासून ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जळगावला दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.