जळगाव : संपूर्ण विश्वात व देशात एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असून आज पक्षाचा 43वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. भारतीय जनता जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगरा च्या वतीने जिल्हा कार्यालय वसंत स्मृती बळीराम पेठ येथे सकाळी 9 वाजता भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आ सुरेश भोळे राजू मामा व महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी हस्ते प्रथम भारत माता पंडित दीनदयाल डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारर्पण करण्यात आले.
यानंतर पक्ष ध्वजवंदन करण्यात आले या प्रसंगी जि प उपाध्यक्ष लालंचद पाटील म न पा गटनेते राजेंद्र घुगे पाटील ग्रामीणचे प्रभाकर पवार हे उपस्थित होते यानंतर देशातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना लायू संबोधन केले. या नंतर अ राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्रीडा वैद्यकीय शैक्षणिक उदयोग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 43 नागरिकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर राजू मामा यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सांगितले की जनसंघते भाजप हा पक्षाचा प्रवास असून 43 वर्षांमध्ये पक्षाने विश्वात एक नंबरचा पक्ष म्हणून नावलौकिक केलेले आहे. ते फक्त पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्याग बलिदाना मुळेच आज पक्ष देशात एक नंबरचा पक्ष म्हणून विश्वामध्ये आहे. देशाचे यशस्वी असून तळागाळापर्यंत विविध योजना पोचवण्याचे कार्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून 365 दिवस अहोरात्र मेहनत करणारा भा ज पा हा कार्यकर्ता आहे असे प्रसंगी त्यांनी सांगितले.
या नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रा पक्ष कार्यालय येथून सुरू होऊन सुभाष चौक टाॅवर चित्रा चौक छत्रपती शिवाजी महाराज मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यारर्पण करण्यात आले या यात्रेत शिवसेनेचे गणेश सोनवने सरिता ताई माळी कोल्हे दिलीप पोकळे शौभा ताई चौधरी व पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते वंदे मातरम भारत माता स्वातंत्र्यवीर सावरकर अमर हे जप तक सुरज चांद रहेगा सावर जीका नाम रहेगा अशा घोषवाक्याने संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
हे पण वाचा..
2 तरुण चालत्या ट्रेनमधून फलाटावर पडले, एक ट्रेनखाली गेला अन्.. पहा थरकाप उडविणारा Video
अरे बापरे..! एकाच कुटुंबातील तिघांनी उचललं टोकाचं पाऊल, जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
घर-गाडी खरेदी करणाऱ्यांना दिलासा! RBI ने रेपो दराबाबत वर्षभरात पहिल्यांदाच घेतला ‘हा’ निर्णय?
लग्नाआधीच भावी जावई घरी आला, सासू बाहेर जाताच घडलं धक्कादायक
यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळा येथे सावरकरांना अभिवादन करण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केले पक्ष कार्यालयावर सुंदर अशी रोशनाई करण्यात आली असून कार्यालय नवीन रंग काम करण्यात आलेले आहे सकाळी महिला भगिनींनी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली व कार्यालय तोरण फुलांनी सजवण्यात आले होते
















