सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. वाहनांवर स्टंटबाजी करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील. यातील अनेक व्हिडिओ काळजात धडकी भरवणारे असतात. अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला भीतीही वाटेल आणि हसूही आवरणार नाही
एका व्यक्तीने चक्का चाक नसलेला ट्रक भरधाव वेगात चालवला आहे. ट्रकचा वेग पाहून तो दोन चाकांशिवय चालत आहे असं मुळीच वाटत नाही. सध्या सोशल मीडियावर या ट्रकची भलतीच चर्चा रंगली आहे. ‘fun_zone_91’ नावाच्या एका ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४.८ दशालक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोणतीही भीती न बाळगता अगदी सहज ट्रक चालवत आहे. हा ट्रक आठ चाकांचा आहे. मात्र यातील दोन चाकं गायब झाली आहेत. तरीही ट्रकचालक एवढा मोठा ट्रक अगदी सहज चालवताना दिसत आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून थक्क झालेत. असं कसं काय होऊ शकतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
.