पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला आज दुपारी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला. या अपघातात प्रल्हाद मोदी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले. डिव्हायडरला धडकल्यानंतर कारचा अपघात झाला. सर्व जखमींवर म्हैसूर येथील जेएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींचा मोठा भाऊ प्रल्हाद मोदी पत्नी, मुलगा, सून आणि नातवासोबत मर्सिडीज बेंझ कारमधून बांदीपोरा येथे जात होते. दुपारी दोनच्या सुमारास वाटेत कार दुभाजकाला धडकली. अपघाताच्या वेळी त्यांच्यासोबत प्रल्हाद मोदींचा ताफाही प्रवास करत होता.
घटनास्थळावरून मिळालेल्या दृश्यांमध्ये कारच्या पुढील भागाचे गंभीर नुकसान झाले आहे. कारचा बोनेटचा भाग पूर्णपणे खराब झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रल्हाद मोदी यांच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर इतरांना किरकोळ दुखापत झाल्याने म्हैसूरच्या जेएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.