मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध महाविकस आघाडी आक्रमक झाली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचं काढला जाणार असून राज्यपालांना हटवण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. दरम्यान, यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले ना.महाजन?
राज्यपालांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणी मोर्चे काढत असतील तर तो त्यांचा विषय आहे. मात्र राज्यपालांविषयी केंद्र सरकारच निर्णय घेईल, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
दरम्यान, गिरीश महाजन यांना सुरक्षा देण्यात आली होती. त्यांनी ती सुरक्षा नाकारली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया ताईंनाच विचारा तुम्ही कुणाची वाहने वापरली. मागच्या सरकारने जी वाहने वापरली, तीच वाहने आम्ही वापरत आहोत. मला वायप्लस सुरक्षा देण्यात आली होती. मी ती नाकारली आहे. पोलीस खात्यात मनुष्यबळ कमी आहे. पोलिसांमध्ये तणाव आहे. म्हणून मी आधी गृहमंत्र्यांना कल्पना देऊनच सुरक्षा नाकारली आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.