नवी दिल्ली: खिशात रोख रक्कम घेऊन जाणे आता कालबाह्य होणार आहे. वास्तविक, Digital Rupee सर्वसामान्य भारतीयांपर्यंत यायला फक्त एक दिवस उरला आहे. Reserve Bank of India ने 1 डिसेंबरपासून रिटेल डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली आहे, जो किरकोळ डिजिटल चलनासाठी पहिला पायलट प्रोजेक्ट असेल. त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया.
1 नोव्हेंबर 2022 रोजी, केंद्रीय बँकेने घाऊक व्यवहारांसाठी Digital Rupee लाँच केला आणि आता केंद्रीय बँक किरकोळ वापरासाठी हे डिजिटल चलन (CBDC) सादर करणार आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, RBIने म्हटले आहे की, रिटेल डिजिटल रुपयाच्या पायलट प्रोजेक्ट दरम्यान, त्याच्या वितरण आणि वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल. सुरुवातीला त्याचे रोलआउट निवडक ठिकाणी केले जाईल.
E-Rupeeचा कसा कराल वापर
RBIने या संदर्भात आधी माहिती शेअर केली होती. असे सांगण्यात आले की CBDC (डिजिटल रुपया) हे पेमेंटचे एक माध्यम असेल, जे सर्व नागरिक, व्यवसाय, सरकार आणि इतरांसाठी लीगल टेंडर असेल. त्याचे मूल्य सुरक्षित स्टोअरच्या लीगल टेंडर नोट (विद्यमान चलन) च्या बरोबरीचे असेल. देशात आरबीआयचे डिजिटल चलन (Digital Rupee) सुरू झाल्यानंतर, आपल्याकडे रोख ठेवण्याची गरज कमी होईल किंवा ती ठेवण्याची गरजही उरणार नाही.
ई-रुपयाचे वितरण बँकांमार्फत
ई-रुपी डिजिटल टोकनप्रमाणे काम करेल. दुसऱ्या शब्दांत, CBDC हे RBI द्वारे जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप आहे. ते चलनाप्रमाणेच व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ई-रुपयाचे वितरण बँकांमार्फत केले जाईल. डिजीटल वॉलेटद्वारे व्यक्ती ते व्यक्ती किंवा व्यक्ती ते व्यापारी व्यवहार करता येतात. मोबाईल वॉलेटद्वारे डिजिटल रूपयाचे व्यवहार करू शकतील. QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करता येते.
डिजिटल चलनाचे फायदे आणि तोटे
रिझव्र्ह बँकेच्या (RBI) डिजिटल चलनाच्या ई-रुपीच्या तोट्यांबद्दल बोलताना, त्याचा एक मोठा तोटा असा होऊ शकतो की यामुळे पैशांच्या व्यवहारांशी संबंधित गोपनीयता जवळजवळ संपुष्टात येईल. सामान्यत: रोखीने व्यवहार केल्याने ओळख गुप्त राहते, परंतु सरकार डिजिटल व्यवहारांवर लक्ष ठेवेल. याशिवाय ई-रुपयावर कोणतेही व्याज मिळणार नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, डिजिटल रुपयावर व्याज दिल्यास चलन बाजारात अस्थिरता येऊ शकते. याचे कारण म्हणजे लोक त्यांच्या बचत खात्यातून पैसे काढतील आणि ते डिजिटल चलनात रूपांतरित करू लागतील.