जळगाव,(प्रतिनिधी)- गायरान जमीनी निष्कसित करण्याचा न्यायालयाने घेतलेला आदेश त्वरीत मागे घेण्यात यावे या मागणीसाठी भगवान पंडीत सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष आर.पी.आय. (आठवले गट) जळगाव यांच्या नेतृत्वात आज दिनांक २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येतं आहे,धरणे आंदोलन स्थळी आरपीआयचे मिलिंद सोनवणे,जामनेर तालुकाध्यक्ष श्री. जोहरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गायरान जमीनी येत्या दि. ३१ डिसेंबर पर्यंत निष्कसित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने आदेश काढल्याने राज्यातील अनुजाती, आदिवासी, भुमीहिनांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तो आदेश त्वरीत मागे घेण्यात यावा. अन्यथा आर.पी.आय. पक्षाच्या वतीने तिव्र स्वरूपात आंदोलने छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
तसेच जळगांव तालुक्यातील सावखेडा शिवारात वृध्दाश्रमासाठी काही वर्षापुर्वी गायरान जमीन त्यांना देण्यात आलेली आणि जामनेर तालुक्यातील कासली या गावातील बौध्द तडवी, भिल्ल समाजाच्या लोकांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गेली ४० वर्षांपासुन गायरान जमीनी करीत आहे आणि ४० वर्षांपासुन त्यांनी नावावर लावण्यासाठी वेळोवेळी मागणी केली. परंतू अद्यापही झालेल्या नाहीत. तरी महाशयांनी आमच्या मागण्या मंजुर करून आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर शेनफड तुळशीराम सुरवाडे,लक्ष्मण युवराज सुरवाडे,अर्जुन शंकर रामोशे,गौतम तुळशीराम सुरवाडे,विठ्ठल शंकर रामोशे,सागर शेनफड सुरवाडे,गजमल पांडूरंग रामोशे,रमेश चांगो दामोधर,अशोक संपत दामोदर,मच्छींद्र गिरधर खरे,महेंद्र गोरख खरे,सखुबाई तुळशीराम सुरवाडे,भागवत कडू पाटील,आलस्तुराबाई उस्मान तडवी,मनोज साहेबराव तडवी,रब्बानी बंडू तडवी,किसन गरबड सुरवाडे,कडूबा युवराज सुरवाडे,काशिनाथ सुकदेव सोनवणे,धनराल सुकदेव सोनवणे,लक्ष्मण शालीकराम शिंदे,पंडीत मिना शिंदे,रमेश बाबुराव सुरवाडे,शिवाजी सिताराम शिंदे,विठ्ठल संपत दामोदर,दादाराव संपत दामोदर,विक्रम रामचंद्र सुरवाडे,गणपत संपत दामोदर,भारत काशिनाथ पाटील,शेनफड रामचंद्र पाटील,अफसर हुसेन तडवी,शरीफ रहेमान तडवी,बलदार जमाल तडवी यांच्या सह्या आहेत.