Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Vikram Rocket ; इस्रो सबऑर्बिटल या भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेटचे अंतराळात प्रक्षेपण करून इतिहास घडवला

najarkaid live by najarkaid live
November 18, 2022
in Uncategorized
0
Vikram Rocket ; इस्रो सबऑर्बिटल या भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेटचे अंतराळात प्रक्षेपण करून इतिहास घडवला
ADVERTISEMENT
Spread the love

दिल्ली – इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज  vikram Rocket अंतराळात प्रक्षेपण करून इतिहास घडवला आहे.भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेटचे अंतराळात प्रक्षेपण झाल्याने इतिहास घडवला गेला आहे.भारताच्या पहिल्या वहिल्या खासगी vikram Rocket  यशस्वी प्रक्षेपणानंतर लगेचच केंद्रीय मंत्री डॉ. Jitendra singh जे स्वतः या प्रक्षेपण स्थळी उपस्थित होते,  त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली, ” अभिनंदन, भारताचे ! भारताच्या अवकाश प्रवासात नवीन सुरुवात! अवकाश क्षेत्र खासगी- सार्वजनिक भागीदारीसाठी खुले करून हे प्रयत्न यशस्वी केल्याबद्दल PM Narendra Modi यांचे खूप खूप आभार! भारताच्या स्टार्ट अप चळवळीतील निर्णायक टप्पा! अनेक बहुमानांनी सन्मानित असलेल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन”

vikram Rocket

मंत्रीमहोदय म्हणाले की  PM  Narendra Modi यांनी 2020 साली अवकाश क्षेत्र खासगी भागीदारांसाठी खुले केल्यानंतर ISRO च्या प्रवासातील हा मोठा मैलाचा दगड ठरला आहे.इस्रोने म्हटले आहे ” मिशन प्रारंभ यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे” तर Skyroot Aerospace ने म्हटले आहे ” अवकाशाची शोभा वाढवणाऱ्या Vikram -s या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटने इतिहास घडवला आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने vikram Rocket  या भारताच्या पहिल्या वहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास घडवला आहे.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आंध्रप्रदेशात श्रीहरिकोटा येथे स्वतः उपस्थित राहून हा क्षण अनुभवला.

टीम ISRO आणि स्कायरूट एअरोस्पेसचे आपल्या संक्षिप्त भाषणात अभिनंदन करताना डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा हा ऐतिहासिक क्षण! भारतीय स्टार्ट अप्ससाठी निर्णायक टप्पा! पहिलेवहिले खासगी रॉकेट Vikram – s अंतराळात पोहोचल्याने ISRO साठी नवी सुरुवात.

Dr. Jitendra singh म्हणाले की स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात नवीन मैलाचा दगड गाठून इस्रोने आपल्या वैभवशाली अंतराळ सफरीत आणखी एक तुरा खोवला आहे. या प्रक्षेपणामुळे जगाच्या प्रमुख अंतराळ शक्तींमध्ये भारताने स्थान मिळवले आहे आणि अनेक महत्त्वाकांक्षी देश याची दखल घेऊन भारताच्या या क्षमतेचा फायदा घेतील, असे मंत्री म्हणाले. PM Narendra Modi यांनी दोन वर्षांपूर्वी अवकाश क्षेत्र खासगी भागीदारांसाठी खुले केल्यानंतर हा मोठा मैलाचा दगड गाठला आहे, असे वर्णन त्यांनी केले.

Vikram -s हे सिंगल स्टेज इंधन असलेले रॉकेट असून Vikram -1 या रॉकेटच्या पुढच्या वर्षीच्या नियोजित प्रक्षेपणाआधी Skyroot Aerospace च्या प्रकल्पांतील बहुतांश प्रणाली आणि प्रक्रिया यांच्या तपासणीचे काम विक्रम-एस करेल अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिली. ते म्हणाले की हे रॉकेट जमिनीपासून 81.5 किलोमीटर उंचीवर जाते आणि त्यानंतर समुद्रात कोसळते. या प्रक्रियेचा एकूण कालावधी केवळ 300 सेकंद इतकाच आहे.

स्वतःच्या रॉकेट्सचे प्रक्षेपण करण्यासाठी ISRO शी सामंजस्य करार करणारे स्कायरूट हे पहिले स्टार्ट-अप होते असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, खासगी रॉकेटचे हे देशातील पहिले प्रक्षेपण आहेच, पण त्याचबरोबर “प्रारंभ” असे नाव असलेली Skyroot Aerospace या कंपनीची ही पहिलीच अंतराळ मोहीम आहे.

ISRO ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रारंभ मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली आहे, तर Skyroot Aerospaceने म्हटले आहे की, Vikram -s हे अवकाशात झेपावणारे भारताचे पहिले खासगी रॉकेट असल्याने त्याने इतिहास घडवला आहे. या रॉकेटने परदेशी ग्राहक कंपनीच्या एका पेलोडसह एकूण तीन पेलोड अवकाशात वाहून नेले.

प्रक्षेपणानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, ISRO चे पहिले अध्यक्ष आणि भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे संस्थापक डॉ.विक्रम साराभाई यांनी त्यांच्या अत्यंत प्राथमिक शास्त्रीय प्रयोगशाळेत बसून भारतासाठी जे महत्वाकांक्षी स्वप्न पाहिले ते आज तेजस्वीपणे प्रत्यक्षात उतरले आहे.

ISRO ने राष्ट्रीय पातळीवर अर्थपूर्ण भूमिका बजावावी असा आग्रह डॉ.विक्रम साराभाई यांनी नेहमीच धरला याचे स्मरण करून देत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आविष्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतातील युवा प्रतिभेला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आठ वर्षांच्या कायर्काळात नवे धुमारे फुटले आणि त्यांच्यातील तेजोमय आवेश संपूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात साकारला. ते म्हणाले की भारताकडे नेहमीच प्रतिभेचा प्रचंड साठा आणि मोठी स्वप्ने पाहण्याची जिगीषा होती, पण शेवटी पंतप्रधान मोदी यांनी त्याला योग्य मार्ग दाखविला.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की अवकाश क्षेत्रातील सुधारणांनी स्टार्ट-अप उद्योगांच्या अभिनव संशोधन क्षमता खुल्या केल्या आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी देशात केवळ दोन-तीन स्टार्ट-अप सुरु झाले होते आणि आता अत्यंत थोड्या काळात त्यांची संख्या 102 वर पोहोचली आहे. हे स्टार्ट-अप उद्योग आज अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन, नॅनो-उपग्रह, प्रक्षेपक वाहन,जमिनीवरील यंत्रणा, संशोधन, इत्यादी अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष क्षमता यांच्या बाबतीत जागतिक पातळीवर मान्यता मिळविण्यासाठी भारताला सक्षम केले आहे आणि आपले स्टार्ट-अप उद्योग त्याच दिशेने कार्य करत आहेत. भारत आज जगातील होतकरू देशांना क्षमता निर्मिती आणि नॅनो-उपग्रहासह इतर उपग्रह निर्मितीसाठी मदत करत असल्यामुळे आज संपूर्ण जग भारताकडे प्रेरणास्थान म्हणून पाहत आहे असे ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘World Children’s Day’ निमित्त २० व २१ नोव्हेंबरला ‘चला खेळू या’ उपक्रमाचे आयोजन

Next Post

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘हे’ वापरण्यास बंदी !

Related Posts

Facebook Love Murder : फेसबुकवरून ओळख,प्रेम, अविश्वास आणि रक्तरंजित अंत : घाटात फेकला प्रियकराने मृतदेह

Facebook Love Murder : फेसबुकवरून ओळख,प्रेम, अविश्वास आणि रक्तरंजित अंत : घाटात फेकला प्रियकराने मृतदेह

August 31, 2025
RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

August 31, 2025
Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

August 31, 2025
सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

August 31, 2025
Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
Next Post
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘हे’ वापरण्यास बंदी !

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 'हे' वापरण्यास बंदी !

ताज्या बातम्या

Facebook Love Murder : फेसबुकवरून ओळख,प्रेम, अविश्वास आणि रक्तरंजित अंत : घाटात फेकला प्रियकराने मृतदेह

Facebook Love Murder : फेसबुकवरून ओळख,प्रेम, अविश्वास आणि रक्तरंजित अंत : घाटात फेकला प्रियकराने मृतदेह

August 31, 2025
RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

August 31, 2025
Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

August 31, 2025
सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

August 31, 2025
Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us