मेलबर्न : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज म्हणजेच २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. ICC T20 विश्वचषक 2022 मधील भारताचा हा पहिलाच सामना असेल. T20 विश्वचषक 2022 मधील भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना मेलबर्न येथे होणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल. चाहते खूप दिवसांपासून या सामन्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना नेमका किती वाजेल सुरु होईल आणि कुठे पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात..
हा सामना आज रविवार मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याच वेळी, नाणेफेक 1:00 वाजता होईल.
कुठे होणार थेट प्रक्षेपण?
स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. त्याच वेळी, डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तुम्हाला आमच्या वेबसाइटवर उर्वरित सामन्यांचे प्रत्येक लाइव्ह अपडेट मिळेल.
मोफत लाइव्ह कसे पहावे?
जर तुम्हाला हा सामना विनामूल्य पहायचा असेल, तर तुम्ही थेट डीडी स्पोर्ट्सवर थेट पाहू शकाल. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.
हे सुद्धा वाचा..
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या
प्रेयसीसोबत रुग्णालयात गेलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडला; मग…पुढे काय झालं पाहा ‘हा’ VIDEO
आईने नऊ वर्षांच्या मुलीला वडिलांकडे झोपायला पाठवले, पण.. मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर पडले 9 टाके
टीम इंडिया बदला घेणार का?
याआधी २०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते, ज्यामध्ये दोघांनी 1-1 असा सामना जिंकला होता.