Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

३० वर्षांनंतर शिवसेना-भाजपची दोस्ती तुटणार!

najarkaid live by najarkaid live
November 11, 2019
in राज्य, राजकारण
0
३० वर्षांनंतर शिवसेना-भाजपची दोस्ती तुटणार!
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबईः राज्यातील सत्तास्थापनेवरून शिवसेना-भाजपतील मतभेद प्रचंड विकोपाला गेल्याने दोन्ही पक्षांची युती तुटल्यात जमा आहे. ‘रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी…!’ असं ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी केलं. यानंतर केंद्रातील शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. यामुळे भाजपप्रणित एनडीएतून शिवसेना बाहेर पडल्याचं मानलं जातंय. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना-भाजपची ही युती होती.

१९८९ पासून म्हणजे जवळपास ३० वर्षांपासून भाजपसोबत हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर आक्रमक राजकारण करणारी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसह राज्यात सत्तास्थापन करत आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातील ही गेल्या काही दशकांमधील मोठी उलथापालथ आहे. शिवसेना आणि भाजप २०१४ ची निवडणूक स्वबळावर लढले होते. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर ते पुन्हा एकत्र आले. एकीकडे राम मंदिरासाठी बाबरी मशिद पाडण्यात आक्रमक असलेली शिवसेना तर दुसरीकडे धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन टोकाचे विचारधारा असलेले पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येत आहेत. ही महाशिव आघाडी किती काळ टिकेल, हे भविष्यात दिसेलच. अनेक वर्षांपासूनचा शिवसेना-भाजपच्या युतीचा प्रवास आणि त्यांच्यात कसे मतभेद वाढत गेले ते पाहूया…

१९८० मध्ये शिवसेनेचा काँग्रेला पाठिंबा

निवडणुकीपूर्वी सत्तेतील समसमान वाटपाचं आश्वासन भाजपने दिल्याचा दावा करत शिवसेनेने वेगळा मार्ग पत्करला आहे. पण १९८९मध्ये भाजपशी युती करण्यापूर्वी शिवसेना अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा देत होती. १९७५मध्ये इंदिरा गांधी लागू केलेल्या आणीबाणीचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेने १९८०मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्त्वातील सरकारला पाठिंबा दिला होता.

१९८९ मध्ये भाजपशी युती केल्यानंतर शिवसेना ठरली मोठा पक्ष

शिवसेनेने १९८९ भाजपशी युती केली. यात भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी युतीत शिवसेनेचा वरचष्मा होता. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने २८८पैकी १८३ जागा आपल्याकडे ठेवल्या होत्या.

१९९५ मध्ये चालला १९९० फॉर्म्युला, १९९९मध्ये सेनेची ताकद घटली

१९९०मधील फॉर्म्युला १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत कायम राहिला. त्यावेळी भाजपच्या वाट्याला ११७ जागा तर शिवसेना १७१ जागांवर लढली. त्यावेळी केंद्रात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वात भाजपचे सरकार होते. आणि तेव्हापासून शिवसेनेला मागे टाकत भाजपच्या जागा वाढत गेल्या.

अडवाणींच्या काळातही भाजपवर शिवसेनेचा दरारा

२००४ च्या निडणुकीत दोन्ही पक्ष समान जागांवर निवडणूक लढले. मात्र २००९च्या निवडणुकीत भाजपचं पारडं काहीसं जड झालं. त्यावेळी भाजपकडे ११९ जागा होत्या. तर शिवसेनेने १६९ जागा ठेवल्या. त्यावेळी शिवसेनेचं पारडं काहीसं हलकं झालं होतं तरी अडवाणींचं नेतृत्त्व असलेल्या भाजपवर दरारा कायम ठेवला होता. त्यावेळी राज्यात शिवसेनेच्या छत्रछायेखाली भाजप चालत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाजपला ‘कमळाबाई’ म्हणून संबोधत होते. १९९९मध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडी करून महाराष्ट्रात सत्तेत आलेली काँग्रेस पुढे सलग तीन वेळी जिंकली. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीला विरोधी पक्षात बसावं लागलं आणि दोन्ही पक्षसोबत राहिले.

मोदी-शहांच्या काळात मागे पडली शिवसेना

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. यानंतर देशात मोदी लाट आली. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने ४८ पैकी २३ जागा जिंकल्या तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला. पहिल्यांदाच भाजपने अधिक जागा जिंकून महाराष्ट्रात शिवसेनेला मागे टाकले.

२०१४मध्ये स्वबळावर लढली शिवसेना

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये २०१४मध्ये विधानसभा निवडणूक झाली. यानिवडणुकीत जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप मतभेद झाले. दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढले. यावेळी शिवसेनेने ६२ तर भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला. बैठका आणि चर्चेच्या फेऱ्यांनंतर अखेर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. कारण भाजपने बहुमताच्या जवळपास जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला भाजपसोबत जावं लागलं.

२०१९च्या निवडणुकीतही युतीत भाजपचे वर्चस्व

२०१४मध्ये युतीत सहभागी होऊनही शिवसेना सत्तेत सोबत असलेल्या भाजपवर शरसंधान करत राहिली. शेतकरी कर्जमुक्ती आणि नोटाबंदीच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला. तरीही पूर्ण ५ पर्ष महाराष्ट्रात युतीचं सरकार टिकलं. यानंतर २०१९च्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होईल, असे कयास बांधले जात होते. पण भाजपचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. महाराष्ट्रात भाजपने २३ जागा जिंकल्या. तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळवता आला. यावेळी युतीत भाजप मोठा भाऊ ठरला.

पहिल्यांदाच भाजपपेक्षा कमी जागा शिवसेना लढली

या विधानसभा निवडणुकीत प्रथम शिवसेना भाजपपेक्षाही कमी जागांवर लढली. शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच भाजपशी युती केली. भाजप १६४ तर शिवसेना १२६ जागांवर निवडणूक लढली. यात भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या.

भाजपला बहुमत न मिळाल्यानं शिवसेना किंगमेकर बनली

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा भाजपला विश्वासला होता. पण भाजपला १०५ जागा जिंकता आल्या. यामुळे शिवसेनेने आपली बार्गेनिंग पावर वाढवली. सत्तेत समसमान वाटा आणि मुख्यमंपदही अडीच-अडीच वर्ष या मागणीवर शिवसेना ठाम राहिली. पण मुख्यमंत्रीपदाबाबत कुठला शब्द दिला नव्हता, असं सांगत भाजपने सेनेची मागणी फेटाळली. तसंच भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यामुळे शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी मदत घेतलीय. यामुळे शिवसेना-भाजप युतीचे युग संपुष्टात आले आहे.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाळासाहेबांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान दिलं: देवेगौडा

Next Post

महा’पेच: काँग्रेसचा ‘१४-१४-१४’चा फॉर्म्युला?

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
Next Post
महा’पेच: काँग्रेसचा ‘१४-१४-१४’चा फॉर्म्युला?

महा'पेच: काँग्रेसचा '१४-१४-१४'चा फॉर्म्युला?

ताज्या बातम्या

New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
Load More
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us