- भंगाळे गोल्डची यशस्वी वाटचाल ग्राहकांच्या विश्वासामुळेच – भागवत भंगाळे
- भंगाळे गोल्डच्या ग्राहकसेवेला 6 रोजी दोन वर्ष पूर्ण : कृतज्ञता महोत्सवास ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

जळगाव, (विशेष प्रतिनिधी)- सुवर्णनगरी जळगाव मध्ये भंगाळे गोल्डच्या ग्राहक सेवेला दि.6 नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण होत असून ग्राहकांच्या विश्वासामुळेच भंगाळे गोल्डची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे संचालक भागवतदादा भंगाळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.
पुढे बोलतांना भागवतदादा भंगाळे म्हणाले की, अवघ्या दोन वर्षात ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर आम्ही यशस्वी वाटचाल केली आहे. भविष्यातही अविरतपणे ही सेवा कायम राहणार असल्याची ग्वाही आम्ही देत आहोत. जळगावात सोने खरेदीसाठी देशभरातून ग्राहक येत असतात जळगावच्या दागिन्यांना मोठी पसंती असल्याने त्याच बरोबर स्पर्धात्मक मार्केट असल्याने या क्षेत्रात भंगाळे गोल्ड या फर्म ला नावारूपाला आणणे हे आमच्या समोर एक आव्हान होते मात्र ते आव्हान आमच्या फर्म ने पूर्णपणे पेलून शुद्ध सोने, उत्तोमोत्तम डिझाईन्सचे पर्याय, वाजवी दर आणि अत्युच्य दर्जाची सेवा या सूत्रावर आम्ही ग्राहकांच्या पसंतीला उतरलो आहोत. आणि ग्राहकांच्या प्रतिसादामुळेच आमचे सेवेचे दोन वर्ष कसे पूर्ण झाले हे आम्हाला समजले देखील नाही असेही ते यावेळी म्हणाले.
दागिने, आभूषणे आदींमध्ये अलीकडच्या काळात नवनवीन ट्रेंड्स आले आहेत. ग्राहकांचा हा बदलता कल लक्षात घेऊन बाजारपेठेत कुठेही उपलब्ध नसणाऱ्या अप्रतिम डिझाईन भंगाळे गोल्डच्या शोरूम मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर भंगाळे गोल्ड च्या वर्धापनदिनानिमित्त कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या योजनेत ग्राहकांना खरेदी सोबत सोने जिंकण्याची अभूतपूर्व संधी प्रदान करण्यात आली आहे ही योजना 30 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार असल्याचे भागवतदादा भंगाळे यांनी सांगितले. यावेळी डॉ. भंगाळे, सागर भंगाळे आदी उपस्थित होते.