मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत वादावादी पाहायला मिळाली. यावेळी संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर चांगल्याच संतापल्या. “तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता… बसा खाली… मंत्री असाल तुमच्या घरी….” अशा शब्दात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना नीलम गोऱ्हे यांनी झाप झाप झापलं.
नेमका काय आहे प्रकार?
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत शिक्षकांच्या निधीवरुन प्रश्न विचारला. याचविषयी विधानपरिषदेत मग चर्चा सुरु झाली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना याच विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खाली बसून गुलाबराव पाटील काहीसे कुजबुजत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गुलाबराव पाटील यांना पहिल्यांदा समजावलं. मात्र तरीही गुलाबराव बोलत असल्याने आणि हातवारे करत असल्याने गोऱ्हेंना राग अनावर झाला.
हे पण वाचा :
ग्राहकांसाठी पुन्हा खुशखबर! आज सोने-चांदीच्या दरात झाली ‘इतक्या’ रुपयांची घसरण
ATM: तुमची बँक मोफत मर्यादेपेक्षा किती शुल्क आकारते, लगेच जाणून घ्या
धक्कादायक ! झोपेत असलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं ओतलं उकळतं पाणी
यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायकच
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही?, अशी ताकीद दिली. यानंतर गुलाबराव पाटील यांनी मी मंत्री आहे! यावर डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे. दरेकरजी काय चाललंय? हे अहो शांत राहा, असे म्हणाल्या