मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भाव स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ दिसून आलीय. मंदीच्या आशंकेने ही सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच गुंतवणूकदारांनीही सोन्यात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोने पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे.
काय आहे आजचा भाव?
22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,750 रुपये होता, सोमवारी हाच भाव 10 ग्रॅमसाठी 48,150 रुपये आहे. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,530 रुपये मोजावे लागणार आहे. चांदी सोमवारी 59,300 रुपये आहे. रविवारी हाच भाव 58,500 रुपये प्रति किलो रुपये (Silver Price Today) होता.
राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48,150 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,530 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,180 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 593 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.